पान:काश्मीर वर्णन.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १६० )

ती आर्जव करून राजास आपल्या घरी राहावयास घेऊन गेली. याच वेळी शेजारच्या अरण्यांतून एक सिंह त्या शहरांत येऊन माणसें खात असे. एके दिवशीं जया- पीड बाहेर गेला असून त्यास परत येण्यास फार उशीर लागला. तेव्हां त्यास सिंहानें खाल्लें की काय, अशी शंका येऊन ती कलावंतीण मोठ्या चिंतेत पडून दुःख करूं लागली. तों जयापीड परत आला आणि त्यास सिंहाचें वर्तमान समजलें. तेव्हां तो रात्रीं हातांत एक तलवार घेऊन बाहेर पडला आणि त्यानें तो सिंह ठार मारिला. हें वर्तमान तेथील राजा जयंत यास समजलें आणि त्यास फार आनंद झाला. पुढें जयं- तानें सिंह मारणाज्याचा शोध करून त्यास आणिलें आणि आपली कन्या कल्याणी व राज्य हीं त्यास दिली. त्यानें त्यास

नंतर जयापीडानें पंचगौड देशावर स्वारी करून

तेथील राजास जिंकिलें. पुढें पूर्व देशाचा राजा जो भीम याच्या येथें तो ब्रह्मचाऱ्याचें सोंग घेऊन गेला. तेथें सिंधु नांवाचा जज्जाचा भाऊ होता. ओळखून भीम राजास सांगितलें आणि त्यास अटकेत टाकविलें. तेव्हां कांहीं युक्ति करून तो तेथून सुटला आणि त्यानें भीमाचें राज्य घेतलें. नंतर जयापीडानें नेपाळ देशावर स्वारी केली. त्या वेळी तेथें अरमुडी नांवाचा राजा राज्य करीत होता. त्यानें याच्या सैन्याचा नाश करून जयापीडास प्रतिबंधांत ठेविलें. या प्रसंगी त्याचा मोठा विश्वासूक व इमानी एक मंत्री बरोबर होता. त्यानें आपले प्राण खर्च करून राजास सोडविलें. तेथून