पान:काश्मीर वर्णन.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १५९ )

●अद्यापि आहेत असें कल्हण लिहितो. मार्तंड या गांवाची व याच नांवाच्या तेथील देवालयाची स्थापना यानेंच केली असल्याचें पूर्वी सांगितलेंच आहे. यास कुवलयादिस व वज्रादित्य असे दोन पुत्र होते. यानें इ० स० ६९३ पासून ७२९ पर्यंत राज्य केलें. याच्या मागून कुवलयादित्य, वज्रादित्य, पृथिव्यापी- डव व संग्रामपीड हे अनुक्रमें राजे झाले. पण यांच्या कारकीदींत विशेष स्वारस्याच्या गोष्टी वर्णिलेल्या नाहीत. यांच्या नंतर ललितादियाचा नातू -

जयापीड गादीवर बसला. तो आपल्या आजा-

प्रमाणे प्रतापी व शूर होता. त्याच्याजवळ ८० हजार लढाऊ रथ होते. तो आपलें सैन्य बरोबर घेऊन दिग्वि- जय करण्यास निघाला. तेव्हां मांगें त्याचा मेहुणा जज्ज यानें त्याचें राज्य बळकाविलें. हें वर्तमान ऐकून त्याचे कांहीं मंत्री व सैनिक राजास सोडून देऊन जज्जा- कडेस परत जाण्यास निघाले, तरी तो अगदीं न डगम- गतां देश जिंकण्यास तसाच पुढे गेला. त्यानें प्रया- गांत लक्षास एक कमी इतके घोडे दान दिले आणि जो कोणी मजपेक्षां एक घोडा जास्त देईल तो माझें नांव मागें पाडील, असा लेख तेथें करून ठेवून पुढें गौड देशांत पौंड्रवर्धन नांवाचे शहरी गेला. तेथें एका देवालयांत कमला नांवाच्या एका कलावंतिणीचा नाच व गाणें चालू होतें. त्या स्थली राजा जाऊन बसला. तेथें त्यानें तांबुलाकरितां नेहमीच्या संवयीप्रमाणें हात मागें केला. तें पाहून हा कोणी मोठा राजा आहे असें त्या कलावंतिणीनें ओळखिलें, पुढें नाच आटपल्यावर्