पान:काश्मीर वर्णन.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १५८ )

त्याज- इशानदेवी व चक्रमदिका नांवांच्या ह्याच्या तीन राण्या होत्या. शक्तिस्वामी ह्मणून याचा एक मंत्री होता. तो अभिनंद कवीचा मूळ पुरुष होय. अभिनंद हा अनुष्टुप्वृत्त उत्तम लिहीत असे. यानें कादंबरीकथासार नांवाचा ग्रंथ | याच वृत्तांत लिहिला आहे. याच नांवाचा दुसरा एक कवि इ० स० ७८० च्या सुमारास होता. याच्या बापाचें नांव शतानंद होतें. त्यानें रामचरित्रकाव्य लिहिले आहे. चंकुण नांवाचा दुसरा एक मंत्री राजानें बाहेरच्या देशांतून आणविला होता. पाशी दोन मणी होते. त्यांतील एकाच्या योगानें नदीचा प्रवाह दुभागत असे आणि दुसऱ्यानें तो सांधत असे. ते मणी राजानें मागितले असतां त्यांच्या बदली मगध देशांतून जी बुद्धाची मूर्ति अंचारीतून राजानें आणिली होती ती मंत्र्यानें मागितली. तेव्हां ती देऊन राजानें ते मणी त्याजपासून घेतले. मंत्र्यानें ती मूर्ति नेऊन विहारांत स्थापिली. ललितादिय पूर्वजन्मीं परम धार्मिक होता, त्यामुळे देवसुद्धां त्याचा हुकूम मानीत असत व इंद्रानें त्याच्या इच्छेवरून त्यास एके वेळी कवठाची भेट पाठविली होती असे कल्हण लिहितो. अशा प्रकारचे लेख कविसंप्रदायास अनुसरून स्थल- विशेषीं लिहिले असावे असें ह्मणणे भाग पडतें. असो. एके प्रसंगी हा राजा मारवाड देशावर स्वारी करण्यास गेला असतां तेथील मंत्र्यानें जवळचा मार्ग दाखवितों ह्मणून फसवून त्यास वालुकामय प्रदेशांत नेलें. तेथें त्याचें सैन्य तृषाक्रांत होऊन मरूं लागलें. तेव्हां राजानें भाल्यानें त्या वाळवंटांत झरे काढिले. ते