पान:काश्मीर वर्णन.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १५७ )

केला. याचा गुरु मिहिरदत्त यानें गंभीरस्वामी नांवाचें देवालय बांधिलें. हा राजा अभिचारानें (जारण- मारणविद्या ) मरण पावला. नंतर याचा बंधु तारा- पीड हा गादीवर बसला. हा मोठा क्रूर व दुष्ट होता. यानें ब्राह्मणांचा फार छळ केला. याच्या मांगून सर्वांत लहान बंधु -

ललितादित्य (मुक्तापीड ) गादीवर बसला.

याच्या पराक्रमाचें, धार्मिकपणाचें व दुसऱ्या गोष्टींचें पुष्कळ वर्णन दिले आहे. त्यांतील थोडासा उतारा येथें देतों. हा मोठा धर्माभिमानी होता. यानें गौड देशाचा राजा जो यशोवर्मा यास जिंकिलें आणि त्याचें राज्य मोडून त्याच्या पांच जहागिरी करून त्या आपल्या सरदारांस दिल्या. प्रसिद्ध कवि वाक्पति व भवभूति हे या यशोवर्म्याच्या पदरी होते. पहिल्याने आपल्या राजाचें चरित्र ( गौडवध ) नांवाचा ग्रंथ प्राकृत भाषेत लिहिला आहे. तो रा० ब० शंकर पांडुरंग पंडित यांनीं छापून प्रसिद्ध केला आहे. त्यांत भवभूति हा वाकूपतीचा शिष्य असावा असे ते ह्मणतात. ललि तादित्याच्या सैन्यांत कलिंग देशांतील हत्ती पुष्कळ होते. त्यानें कर्नाटक देश जिंकला, तेव्हां रवा नांवाची राणी तेथें राज्य करीत होती. जालंदर व लाहोर हे देश काबीज केले आपल्या अनुजीवी लोकांस राजे नेमिले. णेस सलवार व उत्तरेस तिबेट व बुखारा यांजवर स्वाया केल्या होत्या. याप्रमाणें त्यानें आपढ़ें सर्व आयुष्य स्वाया करून देश जिंकण्यांत घालविलें. कमलावति, यानें मगध, आणि तेथें त्यानें दक्षि- 14