पान:काश्मीर वर्णन.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १५६ )

हा आपला त्यांच्यापुढें टिकाव लागत नाही, असे पाहून त्यानें शालिवाहन शकाच्या ७३५वें वर्षी चीनच्या बादशहाची मदत मागितली व पुढें ७४२वें वर्षों बादशहानें चंद्रापीड यास राजा असा किताब दिला, असें चीनच्या इतिहा- सावरून दिसतें. पण ही मदत त्याचा पुत्र चंद्रापीड यानें मागितली असें फ्रेंच विद्वान् एम्. रिमसा याचें मत आहे. यानें ५० वर्षे राज्य केलें. याच्या कारकीर्दीचें वरेंच वर्णन दिलें आहे. याच्या मागून याचा वडील पुत्र -

चंद्रापीड ( चंद्रानंद ) गादीवर बसला.

कार्तवीर्यासारखा मोठा पराक्रमी व धार्मिक होता. एक विद्वान् ब्राह्मण निजला असतां आपोआप मरण पावला. तेव्हां त्याची बायको राजाकडे जाऊन ह्मणाली कीं, हा अन्याय तुझ्या राज्यांत कसा झाला व माझ्या नवन्यास कोणी मारिलें याचा पत्ता तूं न लावशील तर मी उपोषणे करून प्राण देईन. राजानें गुन्हेगाराचा तपास करण्यास पुष्कळ यत्न केला, पण कांहीं शोध लागेना. तेव्हां तो लागेपर्यंत अन्न ग्रहण करावयाचें नाही, असा निश्चय करून राजा उपोषणें करीत एका देवालयांत बसला. तेव्हां देवता प्रसन्न होऊन तिनें गुन्हेगाराचा शोध लावण्याची युक्ति सांगितली आणि त्याप्रमाणें शोध लागला. हा राज्य करीत असतां त्याचे प्रधान देवालय बांधण्यास जागा पाहिजे ह्मणून तेव्हां जबरदस्तीनें एका चांभाराचें वर घेऊं लागले, तो राजाकडे फिर्यादीस गेला. राजानें तो ह्मणेल तितका पैसा देऊन त्याचें घर घ्यावे म्हणून आज्ञा केली. राणीचें नांव प्रकाशदेवी होतें. हिनें एक विहार तयार याच्या