पान:काश्मीर वर्णन.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १५५ )

शिक्षेस पात्र आहा, पण मी क्षमा करितों, असें त्यानें त्यांच्या कपड्यांवर लिहून ठेविलें आणि तो निघून गेला. जागृत झाल्यावर त्यांनी तो लेख वाचिला आणि पुढे दोघांस फार पश्चात्ताप झाला. या राजानें ३७ वर्षे राज्य केलें. गोनर्द घराण्यांतील हा शेवटचा पुरुष होय. त्याच्या मागून दुर्लभवर्धन गादीवर बसला. हा नाग किंवा कर्कोट घराण्यांतील पहिला राजा. याच्या वेळी म्हणजे इ० स०६३० च्या सुमारास चीन देशाचा प्रसिद्ध प्रवासी हूएनसंग हा बौद्ध धर्माची माहिती करून घेण्याकरितां काश्मीरांत येऊन दोन वर्षे राहिला होता. तो आल्यावेळी राजानें त्याचें आगतस्वागत करण्याकरितां आपल्या मातुलास त्याच्या सामोरें पाठविलें. पुढें तो राजाच्या भेटीस आला तेव्हां कचेरीस सर्व पंडित बोला- विले होते आणि त्या धर्माची सूत्रे तो उतरून घेऊं लागला तेव्हां राजानें त्यास वीस लेखक मदतीस दिले. दुर्लभवर्धनानें ३६ वर्षे राज्य केलें. नंतर —

प्रतापादित्य राजा झाला. यानें प्रतापपूर

शहर स्थापिलें. तें इंद्राच्या अमरावतीप्रमाणें शोभि- वंत होतें. एके दिवशी हा राजा नोण नांवाच्या एका श्रीमंत वाण्याच्या घरी गेला असतां त्याची अति रूप- वति बायको पाहून तो कामातुर झाला आणि तिच्या प्राप्तीसाठी झुरूं लागला. ही गोष्ट वाण्यास कळून त्यानें आपली बायको राजास अर्पण केली. तिजपासून चंद्रापीड, तारापीड, मुक्तापीड (ललितादित्य), वज्रा- दिस व दयादिस असे राजास पुत्र झाले. वेळीं अरब लोकांनी याच्यावर स्वारी केली. याच्या तेव्हां