पान:काश्मीर वर्णन.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १५४ )

तिला असे म्हटले असतां चालेल. याच्या मागून विक्रमा- दिस गादीवर बसला. नंतर त्याचा बंधु -

बालादित्य गादीवर बसला. यानें वंकाल

नांवाचें नगर जिंकून पूर्वसमुद्रापर्यंत जयस्तंभ उभे केले होते. यास तीन बंधु होते. त्यांनी अनेक पूल बांधिले. खड्ड़, शत्रुघ्न्न व मालव या नांवांचे याचे तीन मंत्री होते. याच्या बायकोचें नांव बिंबा होतें. तिनें बिवेश्वर नांवाचें देवालय बांधिलें. कर्कोट नांवाच्या नागानें राणीशी संभोग केला आणि त्याजपासून तिला कन्या झाली. तिचें नांव अनंगलेखा ठेविलें होतें. ही बत्तीस लक्षणी असून सौंदर्याची खाणी होती. ती शृंगारसमुद्रांत कौमुदी ( चंद्रिका ) होती. पाहून एका ज्योतिषानें राजास असें सांगितले की, हिचा पति पृथ्वीचें राज्य करील आणि गोनर्दचा वंश तुझ्या अखेर नाहींसा होईल. कन्येकडे किंवा तिच्या वंशा- कडे राज्य जाऊं नये असा विचार करून राजानें तिचें लग् दुर्लभवर्धन नांवाच्या एका मुलाशीं केलें आणि त्याचें नांव मज्ञादित्य ठेविलें. पण पुढे राजकन्येला तो पति आवडेनासा झाला. ती त्याजवर प्रेम न करितां, बापाचा खड़ नांवाचा जो एक मंत्री होता, त्याजवर प्रेम करूं लागली. एके समयीं तीं दोघें एकमेकांस आलिंगन देऊन निद्राग्रस्त असलेली व संभोग दिल्याची चिन्हें त्यांच्या आंगांवर असलेली पतीच्या नजरेस आली. तेव्हां त्यांचा शिरच्छेद करावा असा विचार प्रज्ञादित्याचे मनांत आला, पण शांति, क्षमा व विवेक यांनी त्यास आवरिलें. तुझी उभयतां देहांत