पान:काश्मीर वर्णन.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १५३ )

एक मोठी मौजेची गोष्ट वर्णिली आहे. ती अशी की, भ्रामरी देवी (काळी ) च्या दर्शनास जावें असें त्याच्या मनांत आलें. देवीकडे जाण्याचा मार्ग कित्येक कोस दूर असून तो भ्रमरांनीं अगदी व्यापून टाकिला होता. कोणी धाडस करून तिजकडे जाऊं लागल्यास भ्रमर यानें घेतलें रणादिस त्यास चावून त्याचा प्राण घेत. आंगावर चिलखत घालून त्याजवर रेड्याचें चर्म आणि त्यावर शेण लिंपून तो तिजकडे जाऊं लागला, तेव्हां भ्रमरांनी चावून चावून त्याची सर्व आच्छादनें तोडून टाकिली आणि त्यास अर्धमेला केला. तो तें सर्व दुःख सोसून अखेर देवीजवळ जाऊन तिजपुढें पडला. तेव्हां देवी प्रसन्न होऊन त्यास वर माग ह्मणाली. तिजपाशीं त्यानें संभोग मागितला. देवांत आणि मनुष्यांत ही गोष्ट कधीही होणार नाहीं, पाहिजे तो दुसरा वर माग असें ती म्हणाली. त्यानें तोच वर देण्याविषयीं आग्रह घरिला. तेव्हां पुढच्या जन्मीं मी तुझी बायको होईन, म्हणून तिनें सांगितलें. याच्या राणीचें नांव रणारंभा होतें. ती रात्री मायावी स्त्री पतिजवळ ठेवून आपण भ्रमर रूपानें उडून जात असे., या राजानें प्रद्युन्म पर्वतावर एक मठ बांधिला व गरीब आजारी लोकांकरितां एक दवाखाना स्थापिला. यानें रामचंद्राप्रमाणे राज्याचा ३०० वर्षे उपभोग घेतला असें कल्हण लिहितो. ही तर केवळ अतिशयोक्ति दिसते. पण कनिंगहायच्या मताप्रमाणे यानें ६५ वर्षे राज्य केलें. इतकी वर्षे राज्य या जनरल देशांतील दुसऱ्या कोणत्याही राजानें उपभोगिलें नाहीं