पान:काश्मीर वर्णन.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १५१ )

इकडे काश्मीरचा खरा राजा जो प्रवरसेन तो तीर्था- टन करीत असतां महादेवाची आज्ञा झाल्यावरून परत काश्मीरांत आला. त्यानें मातृगुप्त राज्य करीत आहे, हें पाहून कदाचित् आपल्यावर संकट येईल म्हणून गुप्तपणें प्रधान मंडळीची भेट घेतली. त्यांनी हा आपला खरा राजा म्हणून त्याचा स्वीकार केला. प्रवरसेनाला विक्र मादित्याचा फार राग आला व मातृगुप्ताविषयीं कांहीं वाईट वाटलें नाहीं. मातृगुप्त या वेळी त्रिगर्त देशावर याच समयास स्वारी करण्यास गेला होता. तेथेंच विक्रमादिस मेल्याची वार्ता ऐकून तो फार दुःखित झाला. प्रवरसेन थोडीशी फौज बरोबर घेऊन त्याच्या भेटीस गेला. उभयतांचें बरेंच भाषण झालें व एकमेकांनी राज्य- स्वीकाराविषयीं आग्रह धरिला. मवरसेनाने दिलेले राज्य आपण स्वीकारावें हें योग्य न वाटल्यावरून मातृगुप्त तेथून काशीस जाऊन सन्याशी झाला. तथापि प्रवर सेनानें मीं आपलें राज्य तुला दिलें असें जें म्हटलें तें खरें केलें. मातृगुप्त काशींत १० वर्षेपर्यंत जिवंत होता. तोंपर्यंत प्रवरसेन काश्मीरच्या राज्याचा वसूल दरसाल त्याला पाठवीत असे.

}}मातृगुप्त बह्मीभूत झाल्यावर मवरसेन काश्मीरचा

खरा राजा झाला. हा महान् धार्मिक, प्रतापि व विद्वान् असून पंडितांचा आश्रयदाता होता. यानें सेतुबंध नांवाचें काव्य बालभाषेंत लिहिलें आहे. तें मुंबईत काव्य- माला नांवाच्या मासिकपुस्तकांत छापिलें आहे. त्याच्या पदरी कालिदास नांवाचा एक पंडित होता असा लेख आहे. प्रसिद्ध कालिदास तो हाच किंवा दुसरा हें