पान:काश्मीर वर्णन.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १४४ )

एका पंडिताचें मत आहे. याचे नेत्र खरोखरी कमला- सारिखे असल्यामुळे त्यास हें नांव मोठें शोभत असे. हिरण्यकुलानें आपल्या नांवाचें एक पूर वसविलें होतें. यांच्या मागून

मिहिरकुल गादीवर बसला. हा हूण कुलांतील

असून यमासारखा दुष्ट व क्रूर होता. याच्याजवळ ७०० लढाऊ हत्ती होते. त्यानें तीन कोट मनुष्यें ठार मारिली. त्याच्या मनांत बौद्ध धर्माची माहिती करून. घेण्याचें आलें. तेव्हां चांगले विद्वान् पाहून त्यांस तो विचारूं लागला. त्यांनी ती आपण न सांगतां तें काम आपल्या एका सेवकास करण्यास सांगितलें. या अपमानामुळे त्यास मोठा क्रोध येऊन तो त्या धर्मी लोकांचा फार छळ करूं लागला. त्याची राणी सिंहलद्वीपाची होती. त्यानें त्या द्वीपावर स्वारी करून तेथील राजास मारिलें आणि त्याच्या जागीं दुसरा राजा बसविला. त्या द्वीपांत निशाणावर सिंहाचें चित्र काढण्याची चाल होती, ती मिहिरकुलानें बंद करून सूर्याचें चित्र काढण्याचा हुकूम केला. नंतर या डीपाहून परत येते वेळीं मार्गात चोल व कर्नाटक येथील राजांस त्यानें जिंकिलें. त्याचें आणि मगध देशाचा राजा बालादित्य याचें फार वैर होतें. दोघांत युद्धप्रसंग होऊन त्यानें बालादि- साचा पराभव केला. त्यानें गंध देशांतील हलक्या जातीच्या ब्राह्मणांस अग्रहार करून दिले व चंद्रकु- ल्ल्या नांवाच्या नदीचा ओघ फिरविला. त्यानें अठरा वर्षे राज्य केलें. याच्या मागून बक, क्षितिनंद, वसु- नंद, नर (दुसरा) अक्ष असे राजे झाले. यांत वसु-