पान:काश्मीर वर्णन.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १४३ ) केली. याच्यानंतर पुनः गोनदं घराण्यांतील पुरुष गादीवर बसला. हा तिसरा गोनई झाला. वुईल्सन्च्या मताप्रमाणे तो इ० शकाच्या १ १८२ वर्षांपूर्वी राजा झाला. पण जनरल कनिंगहायच्या मताप्रमाणे इ० सनाच्या ५३ वें वर्षी तो राजा झाला. वरील प्रमाणे येथेही १२३५ वषाँची चूक येते ! याच्या मागून विभिपण, इंद्रजित, रावण व दुसरा विभिषण (किन्नर) हे अनुक्रमें गादीवर बसले. यांत रावण मोठा धार्मिक होता. दुस-या बिभिषणाने राज्यांत फार अनर्थ केले. एका श्रमणाने ( बौद्धजोगी ) योगबलाच्या सामर्थ्याने या राजाची स्त्री हरण केली. त्या त्वेषाने राजाने त्याचा सूड उगविण्याकरितां बौद्ध लोकांचे हजारों विहार जाळिले आणि त्यांचे अग्रहार हिराऊन घेऊन ते ब्राह्मणांस दिले. याने वितस्तेच्या काठी किन्नरपूर व ऋद्धावण या नांवांची दोन मोठी नगरें स्थापिली होती. यांतील पहिले नगर एका नागाने जाळून टाकिलें, चंद्रलेखा नांवाची एक ब्राह्मणाची स्त्री होती. तिच्या घरांत एके दिवशी राजाचा घोडा शिरला. तेव्हा तिने त्याच्या पुझ्यावर थाप मारिली. तेथे तिच्या हाताचा सोन्याचा पंजा उठला. हें वर्तमान राजास समजून त्याचे मन तिजविषयी कामातुर झाले आणि तो तिच्या प्राप्तीचा उद्योग करित असतां मरण पावला. पुढे नर, सिद्ध, उत्पला (पुष्कलाक्ष ), हिरण्याक्ष, हिरण्यकुल व वसुकुल हे राजे झाले. मुद्राराक्षस नाटकांत चंद्रगुप्त व मलयकेतु यांच्या युद्धांत मलयकेतूच्या बाजूने पुष्कलाक्ष म्हणून जो लढत होता तोच हा उत्पळाक्ष असावा असे .