पान:काश्मीर वर्णन.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १४५ )

नंद हा मोठा विद्वान् होता. त्यानें कामशास्त्रावर एक ग्रंथ लिहिला होता. यांच्या नंतर अक्षाचा पुत्र- गोपादित्य गादीवर बसला. या राजानें आपली कारकीर्द कृतयुगांतल्या नल राजाप्रमाणें केली. त्यानें वाईट चालीचे व शाक्तमार्गी ब्राम्हण यांचे अग्रहार काढून घेऊन त्यांस देशांतून घालवून दिले आणि त्यांच्या बदलीं मध्य देशांतील चांगले विद्वान् ब्राम्हण आणून त्यांस ते अग्रहार दिले. हिंसा करणें त्यास अगदी आव- डत नसे. यज्ञावांचून कोणी पशु मारूं नये म्हणून त्यानें हुकूम दिला होता. याच्यानंतर गोकर्ण, नरें- द्रादिस व युधिष्ठिर ( अंध ) हे गादीवर बसले. नरें- द्रादित्यानें पायच्छ ( स्वच्छपाणी ) नांवाच्या गांवा- जवळ एक शिवालय बांधिलें तें सर्व सहाच दगडांनीं तयार केलें होतें. युधिष्ठिर आरंभी धर्म राजाप्रमाणें नीतीनें वागणारा होता, पण तो पुढें फार अनीतीनें वागूं लागला. तेव्हां त्याच्या पदरचे मांडलिक राजे व त्याचे मंत्री हे त्यास कंटाळून त्याजवर उठले. आपले राज्य आतां सुरळीत चालत नाही असे पाहून त्यानें अग्निप्रवेश केला. तेव्हां त्याचे मंत्री सर्वरत्न, स्कंद- गुप्त व जय, यांनी प्रतापादिस यास आणून गादीवर बसविलें. आदित्य घराण्यांतील हा पहिला राजा होय. पाश्चात्य पंडितांच्या मताप्रमाणें युधिष्ठिर अखेर ३८ राजे झाले व त्यांनी १०१५ वर्षे राज्य केलें. प्रता- पादित्य राज्य मिळविण्याकरितां गळफास लावून घेणार होता. तो प्रसिद्ध विक्रमादित्याचा नातेवाईक होता. पुढे त्याचा पुत्र जलौकष हा राजा झाला. पण या 13