पान:काश्मीर वर्णन.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १४२ )

ते समयीं ते क्षुब्ध होऊन त्यांनी तूं सर्प होशील म्हणून शाप दिला. त्याप्रमाणें तो सर्प झाला. तेव्हां त्यानें उःशाप मागितला. तूं एक दिवसांत सर्व रामायणाचें पारायण ऐकिलें असतां तुला पूर्वरूप प्राप्त होईल म्हणून त्यांनी सांगितलें. त्याच्यानंतर हून जातीचे हुष्क, जष्क व कनिष्क या नांवांचे तीन बंधु राजे झाले. प्रिन्सेपच्या मताप्रमाणे इ० शकाच्या पूर्वी १२७७ वे वर्षों हे राजे झाले. पण दुसन्या शोधकांच्या ह्मणण्याप्रमाणें ते त्या शकाच्या १८ वर्षांपूर्वी होते असें सिद्ध होतें. येथें बाराशें एकोणीस वर्षांची चूक पडते! या त्रिवर्गांनी आपआपल्या नांवांची तीन शहरें स्थापिली. सांप्रत ज्यास वरामुला ह्मणतात तेथें हुष्कपूर होते असे सांग- तात. जुष्कानें जयस्वामी नांवाचें नगर स्थापिलें होतें. यांच्यामागून नागार्जुन नांवाचा राजा झाला. तो बौद्ध धर्माचा मोठा अभिमानी होता. याच्या मागून - अभिमन्यु राजा झाला. त्याच्या आज्ञेवरून चंद्र नांवाच्या पंडितानें व्याकरण रचिलें व पातंजलीचें महा- भाष्य काश्मीर देशांत सुरू केलें. या वेळीं बौद्ध लोक मोठे प्रबळ होऊन ते वैदिक धर्माचा न्हास करूं लागले. पण अभिमन्यु हा ब्राह्मण धर्माचा मोठा अभिमानी असून त्यानें बौद्धांचा फार नाश केला. तो रोमच्या निरो बादशाहासारखा मोठा क्रूर होता. त्यानें बौद्ध लोकांचीं कित्येक देवालयें जाळून फस्त केली. आपल्या नांवाचें एक नगर व देवालय नीलपुराणांत सांगितल्याप्रमाणे सर्पाची पूजा चालू त्यानें बांधिलें आणि