पान:काश्मीर वर्णन.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १४१ )

( आहे. याच्या वेळीं *म्लेंच्छ लोक मोठे प्रबळ होऊन यास फार उपद्रव देऊं लागले. तेव्हां अशोकानें शिवाची आराधना करून या लोकांस जिंकण्यासारखा आपणास पुत्र व्हावा म्हणून वर मागून घेतला. प्रमाणे पुढे त्यास पुत्र झाला. त्याचें नांव राजानें जलौक असें ठेविलें. हा पुत्र महान् धार्मिक, पराक्रमी व दाता निघाला. त्यानें म्लेंच्छ लोकांस जिंकलें आणि त्या- उजूटडिंब नांवाचा त्यांचा देश होता तो अगदीं उध्वस्त करून टाकिला. त्यानें कित्येक अग्रहार करून दिले आणि आपल्या कीर्तीनें ब्रह्मांड भरिलें. याची स्त्री ईशानदेवी ही मोठी धार्मिक असून तिनें मातृकेच्या मूर्तीची द्वारावर स्थापना केली आणि नंदीक्षेत्राभोंवतीं तट बांधिला. एक बाई येऊन तिनें राजापाशीं नरमांस भक्षणास मागितलें, तेव्हां तें आपल्या शरीरांतील देण्यास तो तयार झाला असा तो धार्मिक होता. याच्या नंतर- दुसरा दामोदर नांवाचा राजा गादीवर बसला. हाही मोठा शैव होता आणि कुबेराची व याची मैत्री होती. त्यानें गंधर्वाकडून एक मोठा सेतु ( पूल बांध- विला. एके दिवशी हा राजा पारोसा असतां कांहीं ब्राह्मण येऊन त्याजपाशीं भोजनास मागूं लागले. आपण अस्नात ह्मणून त्यानें त्यांस अन्न देण्याचें नाकबूल केलें.

या शब्दाचा अर्थ सामान्यतः मुसलमान समजतात. पण या

लोकांचा धर्मस्थापक जो महमद याचा जन्म होण्याच्यापूर्वी हजारों वर्षे लिहिलेले महाभारत व रामायण या ग्रंथांत तो येतो. यावरून म्लेंच्छ म्हणजे मुसलमान न समजतां मध्य एशियां- •तील लोक समजावें..