पान:काश्मीर वर्णन.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १४० )

नांवाचा वाडा बांधिला. असे पाश्चात्य विद्वानांचे मत आहे. त्याच्या नंतर त्याचा पुत्र कुशेशय, त्याचा पुत्र खगेंद्र, त्याचा पुत्र सुरेंद्र हे एकामागून एक गादीवर बसले. सुरेंद्राने शंभर यज्ञ करून इंद्राचें नांव मागें सारिलें व दरद देशाजवळ सौरक नांवाचें शहर वसवून त्यांत नरेंद्रभवन यास पुत्र नव्हता, म्हणून त्याच्या पश्चात् दुसऱ्या घराण्यांतील गोधर नांवाचा राजा झाला. पुढे त्याचा पुत्र सुवर्ण, त्याचा पुत्र जनक, त्याचा पुत्र सचीनर, असे आठ राजे झाले. राजांची बरीच कथा व प्रत्येकानें किती वर्षे राज्य केलें त्यांची संख्या दिली आहे. पण त्या कथांत विशेष रहस्य नसल्यामुळे आम्ही वरील राजांनी जितकी वर्षे राज्य केले त्यांची बेरीज देत आहों, ती सुमारें ३०० वर्षे होते. शचीनरच्या मागून त्याचा चुलत बंधु- या

अशोक हा गादीवर बसला. मगध देशचा राजा चंद्र-

गुप्त त्याचा प्रसिद्ध नातू जो अशोक तोहा नव्हे. हा राजा त्याच्या प्रमाणेंच बौद्ध धर्माचा मोठा अभिमानी असून यानेंच तो धर्म या देशांत प्रथम चालू केला. पण ब्राह्मण धर्मासही तो कमी मानीत नसे. यानें वितस्त व शुष्कल हे दोन डोंगरी देश घेऊन आपले राज्य वाढविलें. श्रीनगर शहरची स्थापना प्रथम यानें केली व त्यांत ९६ लक्ष घरें बांधविलीं. बौद्ध धर्माचे भिक्षुक लोक ( श्रमण ) यांस राहण्याकरितां धर्मारण्य नांवाचा एक मोठा विहार यानें बांधिला. विजबिहार येथील प्राचीन देवालय यानेंत्र बांधविलें होतें म्हणून पूर्वी सांगितलेंच