पान:काश्मीर वर्णन.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १३९ )

हाही ३५ वर्षे सहा महिने राज्य केलें. नंतर त्याचा पुत्र दामोदर हा गादीवर बसला. बापाप्रमाणे मोठा पराक्रमी होता. आपल्या बापास वळरामानें ठार मारिलें या त्वेषानें त्याचें मन जळत होतें. पुढें सिंधु नदीच्या कांठी गांधार देशाच्या राजाच्या कन्येचा स्वयं- वर असून तेथें यादवांस बोलावणें होतें, ह्मणून ते समारं- भास आले असल्याचें राजा दामोदर यास कळलें. तेव्हां तो आपली फौज सज्ज करून यादवांबरो- बर लढाई करण्यास गेला. तेथें कृष्णाची व त्याची लढाई झाली, तींत दामोदराचा पराजय होऊन तो पडला. यानेंही पस्तीस वर्षे सहा महिने राज्य केलें. याची बायको यशोमति ही या वेळीं गरोदर होती. तिला कृष्णानें गादीवर बसविलें. तेव्हां तें राज्य न बुडवितां यशोदेस गादीवर बसविलें, याचें कारण काय हाणून श्रीकृष्णास प्रश्न विचारतां तें राज्य ( काश्मीरदेश ) उमाचें माहेरघर आहे व तें बुडविलें तर शंकरास राग येईल ह्मणून त्यांनी सांगितलें. ही कथा नीलपुरा- णांत दिली आहे ह्मणून आम्हांस श्रीनगर येथें असल्या- वेळीं समजलें. असो. पुढें तिला पुत्र झाला. याचेंही नांव गोनर्दी (दुसरा) ठेविलें. याच सुमारास भारती महायुद्ध झालें. त्यास युद्धास पण गोनई हा लहान असल्यामुळे बोलाविले नव्हते. याच्या नंतर बावन्न राजे झाले व त्यांनी १२६६ वर्षे राज्य केलें. ५२ नांपैकी १७चीं नांवें मात्र या कल्हण सांगतो. याहून विशेष माहिती देत नाहीं. यांच्या मागून लन राजा झाला, हा देरायस हिस्तास्पिसचा समकालीन होता,