पान:काश्मीर वर्णन.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १३८)

आतां लिहिला. यास राजावलीपतक असे नांव दिले आहे. यांत अकबर बादशहानें ह्या देशावर स्वारी करून तो काबीज केला, येथपावेतों ह्मणजे इ० स० १९८६ पर्यंतची कथा दिली आहे. यांतील पहिला भाग फारच मोठा ह्मणजे सर्व ग्रंथाचा तीनचतुर्थांश होईल. या राजतरंगिणींतील साद्यंत कथाभाग देण्याचा विचार मनांत आणिल्यास ग्रंथ विस्तार आमच्या इष्ट मर्या- | देच्या फार पुढे जाणार, इतकेंच नव्हे तर तो एक स्वतंत्र ग्रंथच तयार करावा लागणार, करितां औदार्य, शौर्य, पराक्रम, न्याय, दया, विद्या इत्यादि उच्च गुणांनी ज्या राजांची नांवें अमर होऊन राहिली आहेत, त्यांच्या कथा होईल तेवढ्या संक्षेपानें देणार आहोत. विशेषीं वरील गुणांच्या विरुद्ध गुणांनी जे राजे प्रसिद्धीस आले त्यांचीही कथा कोठें कोठें सांगणार आहों; याचें कारण एवढेंच कीं, एखाद्या चित्रांत किंवा तसचीरींत एखादा रंग चांगला खुलून दिसण्याकरितां त्याच्या विरुद्ध रंग त्याच्या शेजारीं भरित असतात. समय-

येथील पहिला राजा गोनंद नांवाचा जाहला. यासच

आदिगोनर्द असें राजतरंगिणीत झटलें आहे. तो मोठा पराक्रमी व रूपवान् होता. तो मगध देशाचा राजा जरासंध याचा साह्यकारी असल्यामुळे त्याचें कृष्णाशीं जेव्हां युद्ध जाहलें तेव्हां त्यानें गोनंद यास आपल्या मदतीस बोलाविलें. त्यावेळी तो फौज घेऊन गेला आणि त्यानें मथुरा शहरास वेढा घालून यादवी फौजेचा अगदीं पराजय केला. पुढे बलराम याच्याशी युद्ध करण्यास येऊन त्यानें त्यास युद्धांत ठार मारिलें. यानें