पान:काश्मीर वर्णन.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १३५ )

पात्रे, संगमरवर व अन्य जातींच्या मौल्यवान् पाषाणांचे तयार केलेले निरनिराळे पदार्थ व दुसरे जिन्नस दाखविले. शाली ज्या दाखविल्या त्यांत दोन तीन हजार किंमतीच्या झणजे कांहींच नव्हत! एक शाल तर पांच हजार किंम तीची दाखविली. तींत एक मासाभर सुद्धां कलावतू नव्हता, पण तिची एवढी किंमत वाढण्याची मुख्य कारणें तिच्या विणकरीचें हस्तकौशल्य व तिची रेशमासारखी मऊ व बारीक लोंकर हीं होत. या वेळीं आह्मी तेथें। असल्यामुळे हा सर्व माल आह्मांसही सहज पाहाण्यास मिळाला.

इतिहास.

या देशाच्या इतिहासास मुख्य आधार राजतरंगिणी नांवाचा संस्कृत ग्रंथ होय. आतां त्यांत दिलेला कथा- भाग वर्णन करण्यापूर्वी या ग्रंथाविषयीं थोडीशी माहिती सांगतों. याचे चार भाग आहेत. त्यांतील पहिल्या भागाचा कर्ता कल्हण कवि होय. तो जयसिंह राजाच्या वेळीं होता. त्यानें हा भाग तयार करण्याच्या कामी नीलमतपुराण (काश्मीर महात्म्य), हरविजय, श्रीकंठचरित्र, अनेकमहात्म्यें, निरनिराळ्या कवींनी लिहिलेलीं त्रोटक राजवर्णनें, प्राचीन देवालयें, विहार व दुसऱ्या इमारती यांजवरील लेख, शिलालेख, दंतकथा, जुनीं नाणीं इत्यादि आधार घेतले होते. वर सांगितलेल्या आधारांत पहिले तीन ग्रंथ काश्मीर येथें उपलब्ध आहेत. नीलमतपुराणांत अतिप्राचीन काळी नील नांवाचा कोणी काश्मीरचा क्षेत्रपाल होता, त्याची