पान:काश्मीर वर्णन.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्रीनगर येथे बहुमोलाच्या शाली आह्मांस पाहण्यास मिळाल्या नव्हत्या. ती इच्छा पुढें अमृतसर येथें तृप्त झाली. आझी त्या शहरी गेलो तेव्हां श्रीमन्महाराज छत्रपती सरकार करवीर यांची स्वारी देशाटनास गेली होती, ती पेशाबराहून थोडेच दिवसांत तेथें परत येणार ह्मणून आमचे प्रियबंधू यांचे पत्र आह्मांस तेथें पावलें. बंधूस भेटण्याच्या इच्छेनें आह्मी आमचा मुक्काम लांबविला. पुढे सुमारें एक आठवड्यानें महाराजांची स्वारी तेथें आली. आपले देशबांधव व प्रियबंधु यांस भेटून त्यावेळी आह्मास किती आनंद झाला असेल ह्याची | कल्पना कोणासही करितां येईल. अमृतसर येथें शाली करण्याचे हजारो माग असून श्रीनगरच्या खालोखाल तेथें शालीचा व्यापार होत असल्याचें पूर्वी सांगितलेंच आहे. श्रीनगराप्रमाणें तेथेंही शालींचा व्यापार कर- णारे कांहीं श्रीमान् दुकानदार आहेत. त्यांत शंभू- नाथ रघुनाथ दास या नांवाची एक प्रसिद्ध व्यापारी कंपनी आहे. तिचे पुढाऱ्यांनी श्री० म० छ०, त्यांचे बंधु श्री० वापू साहेब कागलकर, भावनग- रचे राजपुत्र श्री० भावसिंगजी व या त्रिवर्गांचे रक्षक मे० फ्रेजर साहेब आदिकरून मंडळीस आपले दुकानों पानसुपारीस बोलाविलें. त्या वेळी दुकानदारांनी हातांनी विणलेल्या व मागावर काढलेल्या लहान मोठ्या किंमतीच्या शाली, लोंकरी कपडे, काबुली लोंकरी कपडे, बुखारा येथील रेशमी कपडे, मिन्याचें व नकशीचें काम केलेली निरनिराळ्या जातींची पात्रें, दागीने, हस्तिदंत व चंदन यांजवर खोदीव काम केलेले पदार्थ, पेपिअरम्याचीची