पान:काश्मीर वर्णन.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १३३ )

घसरला तर सर्वांच्या हाडांचा चुराडा उडून जाणार. या देशीं टांग्यास घोडे जोडण्याची विक्षिप्त रीत पाहून वरील प्रकारचा अनर्थ ओढवण्याची दहशत केव्हां केव्हां आझांस पडे. हे टपालटांगे एक्यासारखे असतात, झणजे त्यास दोन दांड्या असतात. एक घोडा या दांड्यांमध्यें व दुसरा उजव्या दांडीच्या बाहेर जोड- तात. यामुळे तो अलग बाजूस राहतो. टपालाचे घोडे बहुतकरून मोठे इमानी व सालस असतात, पण त्यांतून एकादा मनुष्यप्राण्याप्रमाणें निमकहराम भेटून दुलाच्या मारूं लागे आणि टांगा भलतीकडेच ओढूं लागे, तेव्हां आमची अगदी पांचावर धारण बसून जात असे, पण भोंवतालच्या वनश्रीची नानाविध मोहक रूपें अवलोकन करीत असतां स्वर्गास पोचविणाऱ्या या मार्गक्रमणापासून पराङ्मुख व्हावें असें कधींही वाटलें नाही. घोडा दांडगाई करूं लागला ह्मणजे आह्मी मात्र घाबरत होतों, पण कोचमन आपल्या बारगिरास लगेंच खाली उतरवून त्याजकडून त्या बेहुकमी जनाव- राच्या कानास चांगला मुंगा घालवून आपण चाबकानें त्याचा समाचार घेऊं लागे. तेव्हां तो एकदम वठणीस येऊन निमुटपणी सरळ मार्गानें चालूं लागे. तलेले प्रचंड खडपे मार्गाचा अवरोध करितात ते काढून वर सांगि- टाकून रस्ता साफ ठेवण्याकरितां मजुरांच्या टोळ्या काम करीत असलेल्या जागोजाग दृष्टीस पडत. पावेतों जाहलेली हकीकत आह्मीं प्रिय वाचकांपुढे ठेविली आहे. येथ-

आतां एक गोष्ट सांगून हा भाग पुरा करितों.

J2