पान:काश्मीर वर्णन.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्या- केला. शिया कांग्रीटा मात्र आह्मीं बरोबर आणिली. तिला जवळ घेऊन तिच्या उबेनें झोपी गेलों. रात्रीं हांजीनें कोठें बरवा केला किंवा नाही हे सुद्धां समजलें नाहीं. दुसरे दिवशीं सकाळीं थंडीचा कडाका थोडासा कमी झाला. तेव्हां आह्मी बिछान्यावर उठून वसलों आणि वूलर सरोवर मागें केव्हां गेलें ह्मणून हांजीस विचारिलें. तें मागें रात्रीच गेलें आणि दोन प्रहरचे आंत आपण बरामुला येथें पोंहोचूं ह्मणून त्याने सांगितलें. प्रमाणें आह्मी श्रीनगर सोडल्यापासून चोवीस तासांत तेथें परत आलों. पुढें वरामुला येथें भोजन करून आह्मी टांग्यांत बसलों आणि जातेवेळाप्रमाणे मार्गात दोन मुक्काम करून रावळपिंडीस परत आलों. कोणाचा हात पाय न मोडतां किंवा विशेष हाल वनवास न होतां आह्नीं सुखरूप परत आलो. ही गोष्ट आमच्या बरो- बर असलेल्या दोन इसमांच्याच पुण्याईनें घडली असें आह्मीं मानिलें. कारण आह्मांस तर साडेसातीनें पुरें वेढिलें होतें. असो. मार्गाच्या एके बाजूस अति उंच कड्यावरून हत्तीच्या आकारास तुच्छ मानणारी पर्व- तांचीं खड़पें तुटून कोठें कोठें खाली कोसळत असतां त्यांस आड येणाऱ्या प्रचंड वृक्षांचा सुद्धां चुराडा उड- वून त्यांसह सडकेवर येऊन पडतात. अशा वेळीं कां जर एकादा टांगा त्यांच्या सपाट्यांत सांपडला तर त्यांतील प्रवासी, कोचमन, त्याचा वारगीर व टांग्याचे घोडे या सर्वांचा कपाळमोक्ष होऊन त्यांस तेथें स्वर्ग- प्राप्ति होईल. तसेंच मार्गाच्या दुसऱ्या बाजूस अति खोल व विशाळ दरे लागतात. तिकडे कां जर टांगा