पान:काश्मीर वर्णन.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १३१ )

विचार मनांत आणिला असतां त्यांनी तसे करणें हेंच योग्य होतें व आपण एकट्यानें राहून आपली निभावणी लागणार नाही, असे विचारतरंग मनांत येत असतां परत येतेवेळी वितस्तेचा प्रवाह अनुकूळ असल्यामुळे एकाच वल्ह्याच्या सहाय्यानें होडी सपाट्यानें चालली होती. श्रीनगर मार्गे पडत चाललें, सातही पूल ओलां- डून आझी पुढे आलों. सरकारी वाडे, मंदिरें, मशिदी व श्रीमान् लोकांचे वाडे हीं एकामागून एक मागें पडत चालली. शंकर पर्वत व हरि पर्वत हेही दृष्टीच्या आड होत गेले. जातेवेळीं श्रीनगर केव्हां दृष्टीस पडेल ह्मणून आमच्या मनास जें औत्सुक्य उत्पन्न झाले होतें त्याचे ठिकाणी हा देश आपणास पुनः कशाने पहावयास सांपडणार, असें मनांत येऊन औदासीन्य वाटू लागले. वितस्ता व तिच्या कांठची वनश्री या दोन जुळ्या बहिणी मात्र जसें काय आमच्या वियोगजन्य दुःखाचें शांतवन करण्याच्या बुद्धीनें आह्मांस बरामुलापर्यंत पोंचविण्यास आल्या.

अशा प्रकारच्या विचारांनी आमचें मन व्याकुळ झाले

होतें. राहून राहून श्रीनगराकडे मागें पाहात व नदीच्या दोहों तीरांवरील चित्तवेधक वनशोभा अवलोकन करीत आह्मी सादीपुर व संबल हीं गांवें ओलांडून पुढे आलों. जातेवेळीं मानसबल सरोवर वलंका बेट यांजवरील देखावा आह्मास पहावयास मिळाला नव्हता. तो परत येतेवेळी अवलोकन करूं ह्मणून बेत केला होता, पण तो फसला. कारण त्या स्थलांच्या जवळ येण्यापूर्वीच रात्र पडली. तेव्हां आह्मीं होडींत उपहार