पान:काश्मीर वर्णन.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १३० ) आह्मीं या देशी स्थितीत जाण्याच्या पूर्वी वाचिलें होतें. त्यांत खाण्यापिण्याच्या व दुसऱ्या गोष्टींसंबंधानें त्यांचे फार | हाल झाले ह्मणून लिहिलेलें आठवून आह्मांस फार अचंबा वाटे. कारण त्यांच्या व आमच्या जमीनअस्मानाचा फरक असल्यामुळे प्रवासांतील सर्व दुःखें खरोखरी आमच्या वाट्यास यावयाचीं; पण तसें | मुळींच अनुभवास आलें नाहीं असे झटलें असतां चालेल. काश्मीर देश सोडते वेळी मात्र ठाकूर साहेबांच्या मनांत जे विचारतरंग आले तशाच प्रकारचे विचार आमच्या मनांत येऊन आम्हांसही एक प्रकारें फार वाईट वाटलें. वर सांगितल्याप्रमाणें होडींत बसून परत निघालों तेव्हां आह्मांस असें वाटलें कीं, येथील वनश्री, केशराच्या बागा, बर्फानें आच्छादित झालेली पर्वतशिखरें, त्यांवरून खाली उतरणारे ओहोळ, शंकरपर्वत व त्यावरून दिस णारा शोभायमान देखावा, त्याच्या पायथ्याशी वळणें घेऊन वाहणारी वितस्ता, दल सरोवर, त्यांतील कम- लांच्या व दुसऱ्या वेली, त्याच्या कांठची आराममंदिरें, द्राक्षवेली, नैसर्गिक बगीचे व त्यांतील कुंज हीं यापुढें आपणास पहावयास कोठून मिळणार? तसेंच येथील प्रमाणें अप्रतिम उदक, आरोग्यवर्धक हह्वा व नाना प्रकारचीं स्वादिष्ट फळें, यांचा लाभ तरी कसा होणार ? अशा प्रकारचे विचार मनांत येऊन एकवार असेंही मनांत आलें कीं, स्वदेशी जाऊन तरी यापुढे आपणास काय काय कर्तव्य आहे? तर या भूस्वर्गीच राहून आयुष्य घालवावें पण आमच्या बरोबर असलेले दोन सेवक या गोष्टीस कधींही रुकार देणार नाहीत व त्यांच्या स्थितीचा