पान:काश्मीर वर्णन.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १२९ )

मंडळीचा निरोप घेऊन होडींत येऊन बसलो. येतेवेळी केशराची फुलें, कांहीं स्वादिष्ट फलें, कांग्री व तेथील वनश्री व हवापाणी यांचें स्मरण हीं आह्मी बरोबर घेऊन परत निघालों. फुलें कुजून गेलीं, फलांचा मोहक स्वाद त्यांच्या नाशास कारण झाला. कांग्रीच्या उद- रांत सर्वकाळ राहणारा जो अग्नी त्यानें तिचाही पुढें थोड्या दिवसांत नाश केला. बाकी एक स्मरण मात्र आह्मापाशी राहिले व तें अद्यापि चांगलें जागृत आहे. या कांग्रीस काश्मीर देशांतील लोक मोठी आवडती चीज मानितात. त्यांत गरीब लोक तर तिला आपल्या प्रियेपेक्षा अधिक लाडकी समजून सर्वकाळ गळ्यांत बांधितात. तिच्या संबंधानें कल्हण कवीनें एक सुरस श्लोक लिहिला आहे, तो खालीं देतों.

हिमागमे यत्र गृहेषु योषितां

ज्वलद्रहुच्छिद्र सखी हसन्तिका ॥

विभाति जेतुं मदनेन शूलिनं

- धृता तनुर्वन्हिमयीव चक्षुषाम् ॥ १ ॥ अर्थः - " जणूंकाय महादेवाला जिंकण्याकरितां अनेक डोळ्यांची अशी मदनानें तनूच धारण केलेली आहे, अशी लहान लहान ठिणग्या ज्यांतून बाहेर येत आहेत, अशी बहुत छिद्रे असलेली शेगडी ही हिवाळ्यांत त्या देशांतील घरांत स्त्रियांची मैत्रीण होते. " आह्मी या देशीं गेल्याच्या आदले वर्षी गव्हर्नर जन- रल व कांठेवाडांतील लाठीचे ठाकूर साहेब हा देश पहावयास गेले होते. ठाकूर साहेबांच्या प्रवासाचें वर्णन खरा मकार नांवाच्या मासिक पुस्तकांत आलेले