पान:काश्मीर वर्णन.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १२८ )

लागले. जाण्यायेण्यास ती उपयोगी पडेल, या दोन विचारांनी आह्मी बरामुला येथें रोजच्या भाड्याची होडी ठरवून श्रीनगरास गेलों. पण तेथें गेल्यावर गैरमाहिती मुळें ती आमची चूक झाली असे समजलें व त्याचमुळें जाते- वेळीं आझांस होडींत तीन दिवस काढावे श्रीनगर येथें शेंकडों होड्या वितस्तेंत खेळत असून पाहिजे तेथें जाण्यास त्या बेतवार भाड्यानें मिळतात व अनोळखी प्रवाशांस राहण्यास चांगल्या सोईच्या जागाही तेथें आहेत, असे तेथें गेल्यावर समजलें. तेव्हां बरोबर आणलेल्या होडीवाल्याचा झाल्या दिवसांचा व त्यास परत जाण्यास अधिक दोन दिवसांचा रोज चुकवून देऊन त्यास निरोप दिला. असो. श्रीनगर येथें व त्याचे आसपास ज्या विशेष गोष्टी आमचे पाहण्यांत आल्या त्यांचें वर्णन आम्ही प्रियवाचकांस सादर केलेंच आहे. श्रीनगर येथे आणखी कांहीं दिवस राहून तेथील लोकांचा आचारविचार याजविषयीं अधिक माहिती करून घ्यावी अशी आमची इच्छा होती, पण थंडी आपला अम्मल अधिक जोरानें गाजवू लागली व तेथें झालेले शाळू स्नेही आतां थोड्या दिवसांतच चोहों- कडे बर्फ पडूं लागेल व वितस्ता नदींतील पाणी गोंडून तींतून नावा चालण्यास मोठी अडचण पडेल, याजक- रितां आह्मीं स्वदेशी जलदी परतावें ह्मणून सल्ला देऊं लागले, तेव्हां आह्मी परतण्याचा निश्चय केला.

दुसरे दिवशीं आमचे स्नेह्याचे मार्फत एक टाक

भाड्याची पण हलकी होडी ठरवून भोजनोत्तर आह्मी सिनिअर सेंबर पंडित सुराजकोल यांचा व दुसऱ्या स्नेही