पान:काश्मीर वर्णन.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १२७ )

सुरती तांदूळ, गहूं, मूग व उडीद यांची पक्कान्नें करितात. गरीब लोक मुख्यत्वेंकरून तांदूळ, शिंगाडे, विरे व दुसरी कंदमूलें, भाजा व कांहीं मांस यांजवर उपजी-| विका करितात. हे लोक चहा पिण्याचे मोठे शोकी आहेत. यामुळे प्रत्येक घरांत चहादाणी हें पात्र असा- वयाचेंच. सकाळी व संध्याकाळीं असा दोन वेळ चहा तयार करून तो पुरुष व बायका मिळून घेतात. ह्यांत सुरती व सबजी असे दोन प्रकार आहेत. ह्मणजे इंग्रजी चहा, तो पंजाबांतून या देशीं येतो व सबजी लदाक् प्रांतांतून येतो. येथें कांहीं यवन भांग । व तमाखू ओढतात व पंडित लोकांत कांहीं तपकीर ओढणारे आहेत; पण खाण्याच्या रूपानें तिचें सेवन कोणीही करीत नाहीत. तसेंच विडा खाण्याची वहि- वाटही या देशांत बहुतेक नाहींच असे म्हटले असतां चालेल. सर्व श्रीनगर शहरांत तांबोळ्याचें एकच दुकान असल्याचें समजून आह्मी शहरांत फिरत असतां एकवेळ तेथे गेलो होतो. दुकानदाराजवळ जाडी व बत्ताडी फार तर शंभर पानें होतीं. तीं डबल पैशास दोन देत ह्मणून त्यानें सांगितलें.

प्रत्यागमन.

रावळपिंडी येथे श्रीनगरांतील बड्या कामगारांस 2 जरी आह्मीं पत्रे मिळवून ठेविलीं होतीं तरी तेथें गेल्यावर राहण्यास चांगली जागा न मिळाल्यास लोक होडींतच राहून दिवस काढितात, त्याप्रमाणे आपणही करूं व श्रीनगर येथे आपली सत्तेची होडी असली ह्मणजे कोठें