पान:काश्मीर वर्णन.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १२६ )

चाल आहे. पहिल्या व दुसऱ्या मजल्यास दगड, पक्या विटा व चुना यांचा उपयोग विशेष करितात. तळ- मजल्यावर मोठ्या व लांब तुळया घालून त्यांजवर जमीन करितात. तिसऱ्या व चवथ्या मजल्यांचें काम बहुतकरून लांकडी असतें. या मजल्यांच्या भिंतीऐवजी शिंदी भरितात. सुखी लोकांच्या दुसऱ्या व तिसऱ्या मज ल्यांच्या छतावर सुरेख कोरीव काम करण्याची बरीच चाल दृष्टीस पडते. पेठेंतील बहुतेक घरांस रस्त्याच्या बाजूस दुकानें राखिली आहेत. येथें कौलें मुळींच दृष्टीस पडली नाहीत. प्रत्येक घराच्या वरल्या मज- ल्यावर पांझरण घालून त्याजवर तव्याप्रमाणें भूर्जपत्र अंथरून त्याजवर दीड दोन इंच जाड़ मातीचा थर पसरितात. हौसी लोक वसंत ऋतूंत त्याजवर लहानसे पुष्पवृक्ष व वेली लावितात. त्यांस बहार येतो त्यावेळी रस्त्यानें जाणारे येणारे लोकांस मोठी मजा दृष्टीस पडते. • खेड्यापाड्यांतील गरीब लोकांची घरे धाव्याची आहेत.

खाणेपिणें – या देशांत गायी पुष्कळ असून

त्यांचा या राज्यांत. वध करण्याची सक्त मनाई आहे, ह्मणून सर्व लोकांस दूधदुभतें रगड प्राप्त होतें. तसेंच तांदूळ हे येथील मुख्य धान्य असल्यामुळे सर्व लोक त्याजवर निर्वाह करितात. चांगल्या स्थितीतील लोक दररोज दूधभात, गव्हाच्या पुच्या किंवा चपात्या व द्राक्ष व दुसऱ्या फलांचे मुरंब्यासारखे शिरके केले असून त्यांच्याशी पुन्या खातात. मांस घालून त्याचा मसालाही घालितात. भाजा खातात. भात खातात व त्यांत श्रीमान् लोक विशेष प्रसंगी तांदुळांत कांहीं