पान:काश्मीर वर्णन.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १२५ )

कासिमखान हें राज्य काबीज करीत असतां त्यास येथील लोकांनी फार दिवस शौर्यानें अडथळा केला, ह्मणून बादशाहास राग येऊन त्यानें त्यांचा मानभंग करून त्यांस पौरुषहीन करण्यासाठीं जबरीनें बायकांच्या पेहरणी वापर- ण्यास त्यांस लाविलें. यावरून पूर्वी येथील पुरुष पेहरणी वापरीत नव्हते अर्से दिसतें. पंडित लोक व त्यांच्या बायका केशराचा किंवा शेंदुराचा कपाळास उभा टिळक लावितात. श्रीन-

दागिने — आपल्या देशाप्रमाणें बायकामुलें बहुत-

करून सर्व प्रकारचे दागिने वापरतात, पण त्यांतील कांहींची करणावळ वेगळ्या तऱ्हेची असून त्यांत कुसरकाम विशेष दृष्टीस पडतें. मुंबई व पुणे येथें तयार केलेले आयते दागिने विकत मिळतात, तसे प्रथम कोहाला येथें कांहीं दागिने विकरीस मांडलेले एके दुकानीं आम- च्या दृष्टीस पडल्याचें पूर्वी सांगितलेंच आहे. गर येथें महाराजगंजांत एक दोन दुकांनी बरेच दागिने पाहण्यास मिळाले. त्यांतील कांहीं मुख्यांचीं नांवें सांगतों. नथ, बाळी, गळ्यांतील हार, गुलबंद, पटली, जुगनी, चंपाकळी ; हातांतील कांकणें, पोंहची, कळे, कंकण, पथ्यली, बाजुबंद, नानगे; पायांतील कळे, छळे, पाजेब, झांजन स्त्रियांच्या हातांत कां- चेचीं कांकणें, बिलवर व प्रौढ स्त्रियांच्या पायांतही पैंजण व वाळे घातलेले दृष्टीस पडले.

घरेंदारें— श्रीनगर येथील बहुतेक घरें दोन व

तीन मजली आहेत. क्वचित् चार मजल्यांचीही दृष्टीस पडतात. मोठमोठाल्या घरांत तळमजले राखण्याची