पान:काश्मीर वर्णन.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १२४ )

हा देश विशेष सघन होता असे दिसतें. कारण, त्या वेळीं व्यापारी होड्यांची संख्या अधिक असून बादशाहाचा सुभेदार हिवाळ्यांत सहा महिने बाहेर व सहा महिने या देशी राहत असे, तेव्हां त्यास एक लक्ष रुपये खर्चास लागत असा लेख मिळतो. तसेंच लोकहितवादी यांनीं | लिहिलेल्या हिंदुस्थानच्या इतिहासांत काश्मीर सुभ्याचा | वसूल मोंगल बादशहाच्या वेळी १,२७,००,६३१ रुपये होता असा लेख आहे. -

पोषाक - पंडित लोक पगड्या घालितात. त्यांची

बांधणावळ नागर ब्राह्मणांच्या किंवा पारसी भिक्षुकांच्या (पगडी सारखी असते. त्यांचा रंग पांढरा असतो. तो लग्नकार्यात सुद्धां बदलत नाहीं ह्मणून समजतें. कांहीं पंडित धोतरें नेसतात. कांही विजारी व कचित् पाट- लुणी घालितात. ते अंगांत लांब पेहरणी घालून त्यांजवर जाकिटें, हाफजाकिटें घालून त्यांजवरून चोगे ( झुबले ) घेतात. चांगले सुखी असतात ते लहान मोठ्या किंमतीच्या शाली वापरतात व गरीब लोक लुई ( धोतरासारखें लोंकरीवस्त्र ) पांघरतात. सुरवाल पेहेरतात. गरीब लोक तर आंत लंगोटा घालून कांहीं वर लांब पेहरण घालितात किंवा झुबला घेतात. पुरुषांप्रमाणें मानेपासून पायापर्यंत लांब एक दोन पेहरणी घालितात. त्या पारसी लोकांच्या स्त्रियांसारख्या पांढऱ्या टोप्या घालितात. पोटाशीं कांग्री घेऊन बसतां येईल इतक्या त्या पेहरणी सैल असतात. | सुखी लोकांच्या बायका पेहरणीवर शाली व लोंकरी दुलया पांघरतात. अकबर बादशाहाचा सेनाधिपति बायका पोहोचत अशा