पान:काश्मीर वर्णन.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १२३ )

साधनें फार अपुरती आहेत. ही उणीव श्रीनगरास लोहमार्ग नेण्याचा विचार चालू आहे, तो सिद्धीस गेला म्हणजे दूर होईल.

व्यापार - या देशाचा मुख्य व्यापार यार्कंद,

तिबेट, अफगाणिस्थान, तुर्कस्थान, हे देश व पंजाब प्रांत यांच्याशी चालतो. पंजाबांत अमृतसर है या व्यापाराचें मुख्य शहर होय. येथें काश्मीराहून शाली, लोंकरीची अन्य वस्त्रे, केशर व निरनिराळ्या जातींचीं फळे विकरीस येतात. काश्मीर देशास जो इंग्रजी मालाचा पुरवठा होतो तो सर्व पंजाब प्रांतांतून होतो. हा देश व आपला देश यांजमध्यें दरसाल नव्वद लक्ष रुपयांचा व्यापार होतो. तसेंच आपला देश आणि याकंद यांजमध्ये दरसाल साठ लक्ष रुपयांची घडामोड होते ती काश्मीरच्या द्वारें चालते. काश्मीर देशांत व्यापाराचें मुख्यस्थान श्रीनगर होय. येथें अनेक जातींच्या कारागिरींचे पदार्थ उत्पन्न होतात. त्यांत शाली मुख्य होत. याच्या खालोखाल लदाक् प्रांतां- तील ले हें गांव होय. तिबेट व यार्कंद येथून जाणाऱ्या मालाची घडामोड वरील गांवीं होते.

संपत्ति- - या देशांत सृष्टिजन्य संपत्ति विपुल आहे

पण ती उदयास आणण्याचा उद्योग झालेला नाहीं. मोठमोठे, जमीनदार, सावकार, व्यापारी व कामगार हे लोक वजा- करून सांप्रतकालीं बाकीची बहुतेक प्रजा गरीब अवस्थेत असावी असे त्यांचा कपडालत्ता, खाणेपिणें, कारागीर व मजुरदार यांच्या मजुरीचे दर यांवरून दिसून येतें; पण अकबर बादशाहाचे वेळीं व्यापार अधिक चालत असून