पान:काश्मीर वर्णन.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १२२ )

| तरंगिणी इत्यादि भूर्जपत्रांवर लिहिलेले जुने ग्रंथ शारदा लिपीत आहेत. अलीकडे लिहिलेले देवनगरी लिपीत आहेत. याशिवाय पर्शियन् भाषेत लिहिलेले कांहीं जुने ग्रंथ आहेत. काश्मीरी भाषेशिवाय प्रत्येक प्रांतांत | वेगवेगळी भाषा चालू आहे. या सर्वांस डोग्री भाषा असें म्हणतात. या भाषा पर्शियन् भाषेला जवळ असल्या- मुळे ती ज्या प्रवाशास येते त्याचें या देशी विशेष नडत नाहीं. वर सांगितलेल्या भूर्जपत्रांवरील ग्रंथांविषयीं अशी एक मौजेची गोष्ट ऐकण्यांत आली आहे कीं, ते ग्रंथ पाण्यात बुडवून ठेविले असतां त्यांची लिपि न बिघडतां खुलते पण उष्णता लागली तर मात्र ती खराब होते.

दळणवळण- देशांतल्या देशांतील दळणवळण

मुख्यत्वें नद्या व कालवे यांच्या सहाय्याने चालतें. वजि- रावादेहून जम्मू पावेतों लोहमार्ग असल्याचें व राव- ळपिंडीहून बरामुलापर्यंत टपालटांगे जात असल्याचें पूर्वी सांगितलेंच आहे. जम्मूहून श्रीनगरास टपाल पोहोचविण्यास सरकारी जासूद ठेविले आहेत व तेथून लदाकू, स्कार्ड, गिलजित व दुसऱ्या प्रांतांतील गांवीं टपाल पोहोचविणेचें काम हेच लोक करितात, श्रीनगर, जम्मू, इस्लामवाद, बरामुला, कोहाला, गुलमर्ग, देवल, दोमेल, उरी इत्यादि गांवीं पोष्टआफिसें आहेत. यांचे उत्पन्न व खर्च यांमध्यें काश्मीर सरकारचा कांहीं भाग असल्याचे समजतें. श्रीनगर, जम्मू, इस्ला- मवाद, दोमेल, उरी, बरामुला, सोपूर, देवल, अस्तार, गिलजित् इतक्या स्थली काश्मीर सरकारची तार आफिसें आहेत. एकंदरींत येथील दळणवळणाची -