पान:काश्मीर वर्णन.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १२१ )

संस्कृतज्ञ आहेत असें समजतें. तसेंच श्रीनगर, इस्लामवाद व सोपूर इत्यादि गांवीं भूर्जपत्रांवर लिहिलेले तीन चारशें वर्षांचे कांहीं जुने ग्रंथ अद्यापि मिळतात; पण इंग्रजी किंवा साधारण विद्याभ्यासाच्या संबंधानें पाहिले असतां हा देश आपल्या देशांपेक्षां फार मागसलेला दिसतो. श्रीनगर येथें एक व जम्मू येथें एक अशा दोनच इंग्रजीशाळा आहेत. त्यांत पहिल्या शाळेची माहिती पूर्वी दिलीच आहे. याशिवाय जम्मू येथें एक संस्कृत वं वेदशाळा आहे. विद्याखात्याकडे सरकारांतून दर- साल पन्नास हजार रुपये खर्च होत असल्याचें समजतें. जुन्या चालीप्रमाणे बहुतेक गांवीं देशीशाळा असून त्यांत काश्मीरी व पशियन् भाषांचें लेखनवाचन व कांहीं गणित शिकवितात. स्त्रीशिक्षणास तर अद्यापि आरंभ सुद्धां नाहीं. तत्रापि पंडित लोकांतील कांहीं स्त्रियांस घर- गुती रीतीनें अभ्यास करून सुरेख लिहितां वाचतां येतें ह्मणून समजतें. मिशनरी (पानी) लोकांनी अन्य देशां- प्रमाणे येथेंही संचार केला असून श्रीनगर येथें व दुसऱ्या एक दोन गांवीं धर्मार्थ शाळा व दवाखाने स्थापिले आहेत. काश्मीरी भाषा पर्शियन भाषेला जवळ आहे. | तींत पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी शब्दांचें रूप एकच होतें ह्मणून समजतें. काश्मीरी भाषेतील १०० शब्द घेतले असतां त्यांत ४० पर्शियन्, २५ संस्कृत, १५ हिंदुस्थानी, १० अरबी व १० तिबेटी किंवा लग- तच्या देशभाषेंतील असतात. काश्मीरी दुसऱ्या लिपीस शारदा लिपि असें ह्मणतात. ही लिपि देव- नगरी सारखी आहे: नीलपुराण, बृहत्कथा, राज 11