पान:काश्मीर वर्णन.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १२० )

धर्म व खाजगी या होत, येथें मोठे गुन्हे फार होत नाहीत, इतकेच नाही पण चोया सारखे हलके गुन्हे सुद्धां फार होत नाहीत. एकंदरींत येथील लोकव्यवस्था नीट असून लोकांच्या जीवितांचें व जिनगीचें रक्षण चांगल्या प्रकारें होत आहे. महाराजांस २१ तोफांची सलामी आहे. दत्तकाची सनद आहे. महाराणीस एक . घोडा, शालीच्या लोंकरीचे १२ बकरे व तीन उंच शाली खंडणी द्यावी लागते. सैन्य – इरेग्युलर स्वार ५,०००, पायदळ १४,०००, तोफखान्याच्या व्याटरी १६, यापैकी दोहोंस घोड़े जोडतात. अलीकडे सार्वभौम सरकारानें महाराजांस एक मौंटन् ब्याटरी नजर केली आहे. स्वारांच्या पल: टणी व तोफखाना हीं बहुतकरून जम्मू येथें असतात. पायदळ पलटणीस कवाईत शिकविलेली असून त्यांतील लो- कांचा पेहराव इंग्रजी शिपायांसारखा आहे. यांत मुख्य भरणा डोग्री लोकांचा आहे. हें सैन्य श्रीनगर, जम्मू, गिलजित, अस्तार इत्यादि स्थलीं राहतें. या सर्व सैन्याचे मुख्य अधिपति महाराजांचे धाकटे बंधु आहेत. याशिवाय महाराजांच्या खाजगीकडे पांच हजार घोडीं आहेत. ती प्रांतांतील कुरणांत चारणीस घातली असल्याचें समजतें.

सांप्रत स्थिति.

विद्या – प्राचीन काली हा देश सरस्वतीचें (विद्येचें) आद्यस्थान होता ह्मणून पूर्वी सांगितलेंच आहे आणि सांप्र- तकालींही पंडित लोकांत नांवें घेण्यासारखे कांहीं चांगले