पान:काश्मीर वर्णन.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ११९ )

एक किल्ला आहे त्यांत ठेवितात व दुसरे कैदी दल सरोवराचे कांठीं सरकारी तुरुंग आहे त्यांत ठेवितात. वसुलीसंबंधानें या देशाचे छत्तीस भाग केले असून त्यांस ठाणीं अथवा तहशिली ह्मणतात. त्यांत लहान मोठी खेडी वीस हजार आहेत; पण श्रीनगर आणि जम्मू हीं सोडून पाहिले असतां सांगण्यासारखें मोठें शहर एकही नाहीं असें ह्मटले असतां चालेल. येथें जमिनीच्या प्रत्येक डागास पट्टा ह्मणतात. जमिनीचा सारा दर एकरी आठ आणेपासून दहा रुपयेपर्यंत असून कोठें नक्त व कोठें जमिनींत उत्पन्न झालेल्या महसुला- पैकीं किंवा 3 भाग घेतात. येथें दोन जातींचें रुप्याचें । रे नाणें चालू आहे. त्यांतील एका रुपयास खाम असें ह्मणतात. याची किंमत आठ आणे आहे व दुसन्यास चिल्कि रुपया ह्मणतात. त्याची किंमत दहा आणे धरितात व पाव आण्यास डबल पैसा व अर्ध्या पैशास खाम पैसा ह्मणतात.

या राज्याच्या जमाखर्चाचे आंकडे बरोबर मिळाले

नाहीत पण सर्व बाबींचें उत्पन्न सुमारें ऐशी लक्षांचें असून खर्च पंचाहत्तर लक्षांचा असल्याचें समजतें. जमेच्या मुख्य बाबी जमीन, व्यापारी लोकांस परवाने देतात त्यांज वरील कर, आयात व निर्गत मालावरील जकात, शाली व दुसऱ्या मालावरील कर, केशराचें उत्पन्न, नद्या व सरोवरेंयांत उत्पन्न होणारे पदार्थांचें ( जसे शिंगाडे, मासोळी वगैरेचें) उत्पन्न, किस्त्यांवरील पट्टी हे व दुसरे लहान मोठे अनेक कर आहेत. खर्चाच्या मुख्य बाबी सैन्य, रस्ते, लोकोपयोग कामें, राज्यकारभार, विद्या,