पान:काश्मीर वर्णन.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ११८ )

खात्यांचे मुख्य अधिकारी आहेत. आणि ज्युडिशिअल मेंबर यांजकडे दिवाणी, पोलीस व दुसरीं खातीं आहेत. येथील दिवाणी काम बहुतेक अंशी इंग्रजांच्या दिवाणी कायद्याप्रमाणें चालतें व फौजदारी काम चालविण्यास इंडिअन् पिनकोडच्या धोरणानें एक कायदा केला आहे, त्या प्रमाणें चालतें. मुलकी काम न्यायास व जुन्या वहिवाटीस अनुसरून चालवितात. राज्यांतील सर्व कामकाज पर्शियन् भाषेत चालतें. हा सर्व बाह्य देखावा सुरेख दिसतो, पण स्वदेशी अन्य राज्यांप्रमाणें येथील रेसिदेंत हे खरे सूत्रधार असून राज्यांतील महत्वा- चीं कामे त्यांच्या खासगी सडचाप्रमाणें चालतात ह्मणून समजतें. सांप्रतचे महाराज गादीवर बसले तेव्हां- पासून येथें रेसिदेंताची नेमणूक झाली. त्याचे पूर्वी ब्रिटिश सरकारचा जो येथें अंमलदार असे त्यास "ऑफि- सर आन् स्पेशियल ड्यूटि" असें ह्मणत.

काश्मीर राज्याचे काश्मीर आणि जम्मू असे दोन

भाग केले असून त्यांजवर दोन गव्हरनर नेमिले आहेत. मुलकी आणि फौजदारी खात्यांत गव्हरनरचे हाताखालीं वजीर, तहशीलदार, नायवतहशीलदार, लंबरदार (पाटील) व पट्टवारी ( कुळकर्णी ) हे कामगार आहेत. दिवाणीखात्यांत चीफ जज्ज, सिटी (शहरचे) जज्जेस आणि मुनसफ व पोलीस खात्यांत डिस्ट्रिक्ट सुपरिंटेंडंट्स्, इन्स्पेक्टर्स, डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर्स, जमादार व सार्जंट हे अधिकारी आहेत. दिवाणी कोर्टाचे व दस्त देण्या घेण्याचें काम स्टाम्प कागदावर चालतें. जन्म ठेपेचे किंवा पोलिटिकल कैदी यांस भुंजी नांवाचा सरहद्दीवर