पान:काश्मीर वर्णन.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. अशाच जातीचें सरोवर इ० सं० १८४० मध्ये

या प्रांती उत्पन्न होऊन फुटले. तेव्हां त्याच्या पाण्याचा मुसंडा एवढ्या जोरानें चालूं लागला कीं, तेथून शंभर मैलांवर राहणारे पांचशें सीक शिपाई केरसुणीनें मुंग्यांचा पुंज झाडल्याप्रमाणें वाहून गेले. उत्पन्न होतात. येथील देखावा

चित्रल — ही जहागीर बुनर नांवाच्या दऱ्यांत

आहे. यांतील मुख्य गांवास जहागिरीचेंच नांव आहे. येथील जमीन मोठी सुपीक आहे. युरोपांत पैदा होणाऱ्या फलांतील बहुतेक फलें येथें त्यांत द्राक्षे तर फारच स्वादिष्ट असतात. काफ्रिस्थानच्या देखाव्या सारखा असून हवाही तशीच थंड आहे. येथील पुरुष मोठे उंच असून त्यांचा बांधा ही सुरेख आहे. काश्मीरांतील स्त्रियांच्या विषयी सर्वत्र प्रसिद्धि आहे. तेव्हां येथील स्त्रियांच्या स्वरूपासंबंधानें विशेष लिहिण्याचें कारण नाहीं. येथें गुलामांचा व्यापार पुष्कळ चालतो आणि त्यापासून होणारें उत्पन्न येथील जहागिरीच्या वसुलांतील एक मुख्य बाब आहे. येथील व्यापार करण्याची रीति मात्र अगदी रानटी आहे. ती अशी की, पैशाच्या द्वारें विनिमय न करितां जिन्नसास जिन्नस देऊन किंवा घेऊन करितात. लावण्या-

पुंच-

- या नांवाची जहागीर काश्मीरच्या नैर्ऋत्येस आहे. यांतील मुख्य गांवास जहागिरीचेंच नांव आहे. या गांवीं १०० घरें असून किल्ला, राजवाडा व रहदारी | बंगला आहेत. येथील राजा जातीचा रजपूत असून सांप्रत महाराजांचा भाऊबंद असल्याचे समजतें. |ळ्यांत येथें तीस इंच जाड बर्फ पडतें. याच्या जहागिरीत हिंवा-