पान:काश्मीर वर्णन.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ११५ )

असून उंची पांच हजार फूट आहे. येथील जमीन मोठी सुपीक असून हवाही चांगली आहे. या प्रांताच्या भोंवतालच्या प्रदेशांपैकी अर्ध्या भागाची सर्वे झाली असून अर्ध्याची होणें आहे. या प्रदेशांत जेवढी उंच शिखरें व खोल दरे आहेत, तशीं शिखरें व दरे पृथ्वीच्या दुसऱ्या क्वचितच भागांत सांपडतील; राहिलेल्या अर्ध्या भागाची सर्वे झाली म्हणजे त्यांत धवलगिरी शिखराची बरोबरी करणारीं उंच शिखरें आढळून येण्याचा संभव आहे, असें डा० डब्ल्यु हंटर म्हणतात. येथें घर- णीकंपानें दुभागलेल्या पर्वतांच्या प्रदेशांत व त्यांतून वाहणाऱ्या प्रवाहांत सोन्याची मिश्रधातु पुष्कळ सांपडते. ती मिळवून तींतून सोनें काढण्याचें काम लोक हिवाळ्यांत करितात. त्यांस या कामी बराच फायदा होतो. येथें पैदा झालेले सोनें वीस कशी असतें. या प्रांताचा मालक जातीचा यवन आहे, त्यास थाम (राय ) असा किताब आहे. त्यांजकडून काश्मीरचे महाराजांस सुवर्णमिश्र- धातु खंडणी म्हणून दरसाल पाठविण्यांत येते. तसेंच हंजा, नतर व यासिंद येथील सरदार काश्मीरच्या महाराजांस खंडणीच्या रूपानें दरसाल कांही सुवर्ण पाठ- वितात म्हणून समजलें. पामीर नांवाचा प्रदेश, ज्यावि- षयीं इंग्रज व रशियन् यांजमध्यें मोठा लढा पडला आहे तो येथून जवळ आहे व त्या लढ्याकरितां इंग्र- जांनीं गिलजित् येथें लढाईची चांगली तयारी ठेविली असल्याचें समजतें. असो. हरिद्वाराच्या वरच्या बाजूस गोहना सरोवर कसें बनलें व तें फुटल्यामुळे किती नाश झाला, याची माहिती वर्तमान पत्रांत प्रसिद्ध झालीच