पान:काश्मीर वर्णन.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ११४ )

| तीन पदें आणि आठ अक्षरें आहेत. प्रत्येक मठाच्या द्वाराजवळ चक्रे ठेविलेली असून तीं त्यांच्या आंसांच्या अंकुचीवर उभी केलेली असतात. वर सांगितलेला मंत्र ( गायत्री ) कागदाच्या चिटोज्यांवर लिहून ते चिटोरं वरील चक्रांच्या आरांत चिकटविलेले असतात. गायत्री- पुरश्चरण करणें हें जसे आपण महत् पुण्य मानितों तसें बौद्ध धर्मी लोक हीं चक्रे एकसारखी फिरतीं ठेवणें हें मोठें पुण्य मानितात. म्हणून मठांत जाणारा किंवा बाहेर येणारा प्रत्येक माणूस या चक्रांस गति देतों. त्या योगानें तीं एकसारखीं फिरत राहतात व कांहीं चक्रे तर पाण्याच्या शक्तीनें पानचक्कीप्रमाणे सर्वकाल परिभ्रमण करीत असतात. या प्रांत पांडवांप्रमाणें तीन चार भावांत एक बायको करण्याची चाल आहे. तिची मुलें या बंधुवर्गाविषयी बोलतांना, थोरला बाप, लहान बाप असें म्हणतात. हे तीन चार नवरे असून आणखी पर- पुरुष नवरा करून घेण्याची तिला मोकळीक आहे. इत- केंच नाहीं पण, ले येथील स्त्रिया काश्मीर व यार्केद येथील व्यापाऱ्यांशी हंगामी लगें करितात ती वेगळीच. अशा स्थितीत परस्परांनीं सोडचिठी देणें ही गोष्ट साधा- रण असली पाहिजे.

गिलजित्-हा प्रांत काश्मीरच्या उत्तरेस असून

त्यांत याच नांवाची एक दरी आहे. तींतून वाहणाऱ्या नदीस व प्रांतांतील मुख्य गांवासही गिलजित् हेंच नांव आहे. गिलजित् नदीवर दोग्यांचा पूल आहे. सिंधु नदास मिळते. गिलजित् गांव श्रीनगराहून २४० मैल आहे. या दरीची लांबी सुमारें ४० मैल ती