पान:काश्मीर वर्णन.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ११३ )

गाढवें, बैल, मेंढे, बकरे आणि कुत्रे हे येथील ग्रामपशु होत. ओझी वाहून नेण्या आणण्याच्या कामी या प्रांतों मेंढ्यांचा उपयोग अंधिक करितात. या प्रांतांतील मुख्य शहराचें नांव 'ले. ' येथील वसति सुमारें पांच हजार आहे. लोकांची घरे दोन तीन मजली आहेत. या गांवाचा व्यापार हिंदुस्थान, यार्कंद, खोतान, तिवेट व चि- नईतार्तरी यांच्याशीं चालतो. तिबेट व चिनईतार्तरी येथून काश्मीर देशास लोंकर विकण्यास येते ती याच मार्गानें हजारों मेंढ्यांवर लादून येते. तसेंच या प्रांतीं टाकणखार व गंधक बराच उत्पन्न होतो. हा मालही बाहेर देशी मेंढ्यांच्या पाठीवर लादून विकावयास नेतात. या प्रांताच्या उत्तर भागांतील बहुतेक लोक बौद्ध धर्मी आहेत. तेथें प्रत्येक गांवीं त्यांचा एक मठ आहे. तो दुर्गम स्थलीं बांधिलेला असतो, त्यांत जोगी व जोगिणी राहतात. प्रत्येक मठांत दोन लामा ( गुरु ) असतात. एक पारमार्थिक व दुसरा ऐहिक विषयाकडे लक्ष देतो. यांतील कांहीं मठांस बऱ्याच नेमणुका आहेत. गांवाच्या आग्नयेस हिमिस्गोन्या नांवाचा एक जंगी मठ आहे. त्याचें उत्पन्न मोठे आहे. त्यांत ८०० जोगी ले व जोगिणी राहण्याची सोय आहे. बौद्ध धर्मात वैदिक धर्माचें कांही अनुकरण केलेले दिसतें तें खाली दाख- वितों. ब्राह्मण धर्मांत गायत्री जपाचें जसें महत् पुण्य धरिलें आहे, तसें बौद्ध धर्मात “बुद्धं शरणं गच्छामि, धर्म शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि " या मंत्राचा जप करणें हैं मोठें पुण्य मानितात. गायत्री जशी त्रिपदा व अष्टाक्षरा आहे, त्याप्रमाणे वरील मंत्रांतही