पान:काश्मीर वर्णन.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिलेच आहे. सोपूर गांवींही असाच अनर्थ उडाला. ह्रीं दोन्हीं गांवें वाटेंत लागत असून त्यांत घडलेल्या अन- र्थांच्या खुणा अद्यापि दृष्टीस पडतात. त्या पाहण्यास या देशीं मुशाफरी करणारांस आह्मीं शिफारस करितों. या वेळीं श्रीनगर येथील बराकी पडून बरेच सोजिर चित झाले. याशिवाय राजवाडा, मुनशी बागेतील बंगले व शहरांतील घरे यांस धक्के वसून भेगा पडल्या.

पोट जहागीरदार.

येथील महाराजांच्या पदरी दहा हजारांपासून तो लाख रुपयेपर्यंत उत्पन्न असणारे पोट जहागीरदार बरेच आहेत. त्यांतील कांहीं मुख्य मुख्य जहागिरीविषयीं थोडीशी माहिती मिळाली ती खालीं देतों. १ लदा, २ गिल - जित्, ३ चित्रल, ४ हंजा, ५ पुंच, ६ नागर, ७ चिनानी ह्रीं पोटसंस्थानें होत.. लदाकू— या प्रांताचें क्षेत्रफळ अजमार्से तीस हजार चौरस मैल असून यांतील लोकसंख्या दीड लक्ष आहे. बौद्ध लोकांची वस्ती मुख्यत्वें याच प्रांती विशेष आहे. वर वसाहत असलेल्या फार उंच प्रदेशांपैकी हा एक पृथ्वी- भाग आहे. नदी होय. इन्डस ( सिंधु ) ही याच प्रांतांतील मुख्य येथें क्षार पाण्याची सरोवरें बरीच आहेत. त्यांत प्यांगकांग हें मुख्य होय. हें सरोवर या प्रांताच्या पूर्वेस असून त्याची समुद्राच्या सुमारें १४,००० फूट आहे. बर्फाच्छादित असतात आणि पृष्ठभागापासून उंची येथील पर्वत सर्वका त्या येथें रात्रीं या थंडी फार पडते, पण दिवसा अति उष्मा होतो. प्रमाणे येथील हवा मोठी चमत्कारिक आहे. घोडे (बट),