पान:काश्मीर वर्णन.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १११ )

धरणीकंप, आवडता, तितकाच नावडता आहे असें ह्मणणें भाग पडतें. पूर्वकालीं येथें लहान मोठी गांवें पुष्कळ असून त्यांत वस्तीही चांगली दाट होती, पण दुष्काळ व जरीमरी ही वेळोवेळी प्राप्त होऊन येथील गांवें व त्यांतील लोक यांचा जो नाश होत गेला त्याचें वर्णन राजतरंगिणींत पुष्कळ ठिकाणी आले आहे. हीं अरिष्टें याच देशावर अशीं वारंवार कां यावीत या गोष्टीचा विचार करूं लागलें असतां ईश्वरकरणीं मोठी अगाध आहे ह्मणून स्वस्थ रहावें लागतें. असो.

आतां अलीकडे पन्नास साठ वर्षांत जीं अरिष्टें येऊन

पडली त्यांजविषयों थोडीशी माहिती देतों. इ० स० १८२८ व्या वर्षी श्रीनगर येथें एक मोठा भूकंप झाला. तेव्हां नगरास मोठा धक्का बसून बाराशें घरांचा नाश झाला आणि हजारों मनुष्यें प्राणांस मुकली. हा कंप कमी जास्त पुढें दोन महिने चालू होता. पुढें थोड्याच दिवसांनी जरीमरीची सात आली, ती चाळीस दिवस होती. तिच्या तडाक्यानें सुमारें एक लक्ष मनुष्यें मेली. पुढें पांच वर्षांनी मोठा दुष्काळ पडला व दुसरे रोग उद्भवले; त्यांच्या योगानें पुष्कळ लोकांचा संहार झाला. इ० स० १८८५ त जो भूकंप झाला त्याच्या योगानें वीस हजार घरें, तीस हजार जनावरें व तीन हजार मनुष्यें यांचा फडशा उडाला. हा धका उत्तरेस गिलजित् येथें प्रारंभ होऊन दक्षिणेस सिमल्या पावेतों जाऊन पोहोंचला. ह्याचें केंद्रस्थान बरामुला हें गांव होतें. यामुळे येथील किल्ला, रहदारी बंगला व शेंकडों घरे जमीनदोस्त झाली. त्यांचें वर्णन मार्गक्रमण भागांत