पान:काश्मीर वर्णन.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ११० )

येथील वनश्री अप्रतिम मनोहर आहे. सिंद हा दरा श्रीनगरच्या ईशान्येस आहे. याच्या भोंवतालच्या टेंकड्या लहान मोठ्या वृक्षांनी आच्छादिल्या आहेत. यास लागून दुसरे लहान दरे आहेत. त्यांस मार्ग यांतून जातात. यांतून वाहणारे प्रवाह सिंधु नदीचा उगम बनवितात. बाकी राहिलेल्या दऱ्यांविषयीं लिहिण्यासारखी विशेष .माहिती आह्मांस मिळाली नाहीं. या देशाच्या दक्षि- णेस पुंच आणि राजवारी यांच्यामध्ये फेरोजपूर नांवाची एक खिंड आहे. तिची उंची १२,५०० फूट आहे. राजदिहंगन् नांवाची खिंड या देशाच्या उत्तरेस असून तिची उंची १३,९०० फूट आहे. मार्गन, झोझीला, पिरपंजाल इत्यादि दुसऱ्या खिंडी आहेत. शिकारी लोक यांतून शिकारीच्या शोधार्थ फिरत असतात. यांतील मार्ग फार बिकट असल्यामुळे कित्येक ठिकाणी लहान मुलांप्रमाणे घोडा होऊन चालावे लागतें. वर सांगि- तलेल्या दज्यांतून अनेक प्रवाह वाहतात. त्यांतील कित्ये- कांवर दोन्यांचे पूल केलेले आहेत. त्यांत चिक्का व झुला असे दोन प्रकार आहेत. झुलावरून जाणें फार अवघड असल्याचें पूर्वी सांगितलेंच आहे.

धरणीकंप.

या देशांतील अप्रतिम हवा, पाणी, सृष्टिसौंदर्य इत्यादि अनेक कारणांवरून यास भूस्वर्ग असें नांव प्राप्त झालें आहे ह्मणून पूर्वी सांगितलेंच आहे; पण मानवी अरिष्टांचा विचार न करितां केवळ दैविकांचाच विचार केला असतांही हा देश परमेश्वराचा जितक}}