पान:काश्मीर वर्णन.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांची घोडीं, डोल्या वगैरे यांचे तत्क्षणी दगड होऊन

पडले ते तेथें तसेच आहेत. कोकुर या नांवाचा पिरपंजाल पर्वताच्या उत्तर पा यथ्याजवळ झरा आहे. या झऱ्यास सहा मुखें असून याचें पाणी बरेंगे नांवाचे नदीस जाऊन मिळतें. जेव्हां अफ गाणचे बादशाहा या देशांत राज्य करीत होते, तेव्हां ते या झप्यावांचून दुसरे पाणी पीत नसत, असें थार्नटन् नांवाचे प्रसिद्ध ग्रंथकार लिहितात. स्कार्टू प्रांतांत ब्राल्डू नांवाचा एक मोठा झरा आहे. त्याच्या माथ्याकडील पर्वतशिखरें अति उंच गेलेली असून तेथें अति स्थूल आकाराचे ग्ल्यासियर्स ( बर्फाचे गोळे ) आहेत. त्यांत बालतिरो नांवाचा गोळा ३९ मैल लांब आहे.

दरे व खिंडी,

पृथ्वीवरील सर्व पर्वतांत हिमाचल श्रेष्ठ असून त्याच्या रांगांनी हा देश वेष्टिला असल्यामुळे त्यांतील दरे व खिंडी हीं मोठीं भव्य व विशाल असून त्यांतील देखावे मोठे रमणीय पण भयप्रद आहेत. यांचें वर्णन ( इंग्रजी ग्रंथांत पुष्कळ ठिकाणी दिलेले आढळते. त्यांतील थोडेंसें आमच्या प्रिय वाचकांसाठी येथें देतों. पिरपंजाल' पर्वताच्या उत्तरेस लोलाव व सिंद नांवाचे दरे आहेत. लिदार दरा त्याच्या ईशान्येस व नौबुग पूर्वेस आहे. लोलाब याचें खरें नांव लालभ. ह्यांत सीदार, पाईन व अक्रोड इत्यादि वृक्षांची दाट झाडी लागून गेली आहे. याची लांबी १४ मैल आहे. पूर्वकाली या दप्यांत अस्वले फार राहात असल्यामुळे यास अस्वलांची बाग असें ह्मणतात, 10