पान:काश्मीर वर्णन.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(

१०८)

पडतात, त्यांचे रंग दुपारीं गुलभेंडीच्या फुलाप्रमाणे बदलून तांबड्याची पिवळी, पिवळ्याचीं अस्मानी किंवा जांभळी, अस्मानीची पांढरी व पांढऱ्याची तांबडी होतात. अस्त- मानाचे सुमारास हे सर्व रंग पुन्हां पालटून नवें रूप धारण करितात. याप्रमाणे येथील वनश्री दिवसांतून तीन वेळ. आपला पोषाख बदलते. पण श्रीनगरापासून तें स्थल अधिक दूर असल्यामुळे प्रवासी लोकांस तें पाहण्यास जातांना फार तस्दी घ्यावी लागते. तत्रापि अप्रतिम वनश्री पाहण्याची ज्यांस हौस असते ते तेथें उन्हाळ्यांत जातात. असतो.

त्रिकोटा-

- या नांवाचा पर्वत श्रीनगरच्या दक्षिणेस हा पर्वत बाराही महिने बर्फानें आच्छादित याच्या उत्तरेस एक झरा वाहत असून हिंवा- ळ्यांत त्याचें पाणी उष्ण असतें आणि उन्हाळ्यांत बर्फ वितळून तें यांत येऊन मिसळल्यामुळे तेंच पाणी थंड होतें. हिंदू लोक या स्थलास मोठें पवित्र मानून येथें जत्रा भरवितात. आहे.

शपियनहून रामू गांवास जातांना सुमारे सात मैलां-

वर एक मोठे मैदान लागतें. तेथें नाना प्रकारच्या ●आकारांचे दगड पुष्कळ पडलेले आहेत. त्यांजविषयीं अशी गोष्ट सांगतात की, कांहीं शतकांपूर्वी एका लग्नाचें वहऱ्हाड त्या मैदानावरून चालले असतां वाटेत एक फकीर बसला होता. त्याचा जीव वन्हाडांतील लोकांनी विनाकारण घेतला. हे सर्व लोक आपल्या सरंजामासह मरून त्यांचे पाषाण होवोत ह्मणून त्या फकिरानें मरते- वेळीं शाप दिला. तेव्हां त्याप्रमाणें एकंदर वहाड,