पान:काश्मीर वर्णन.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १०७ )

लोक या स्थली रहावयास जातात. येथें रेसिडेंटाचा बंगला, शर्यतीचें रौंड, क्रिकेट व लान्-टेनिस खेळ्याच्या . जागा आहेत. श्रीनगर येथें पेपिअरम्याचीचें जें काम करितात, त्यावर येथील पुष्पांची नक्कल उतरितात. बवामिश्री नांवाचा एक अवलिया सुमारें चारशें वर्षांपूर्वी होऊन गेला. त्याच्या नांवाची वरील दरी नजीक मशीद आहे. तेथें यवन लोक दर आठवड्यास उन्हा- •ळ्यांत त्याच्या दर्शनास जातात. येथून समोर पण अति दूर पर्वतांची गगनचुंचित शिखरें हिमानें आच्छादित होऊन चकाकत असलेली दृष्टीस पडतात. बाजूस पिरपंजाल नांवाच्या पर्वताची रांग असून तींत नंगा नांवाचा पर्वत आहे. त्याच्या शिखरावरील मोठा रमणीय देखावाही दृष्टीस पडतो. हिवाळ्यांत येथें बर्फ फार पडतें ह्मणून लोक कायमची वसति करून राहात नाहीत. उजव्या अधिक सोनमर्ग ( सुवर्णवाटिका ) - हे स्थल श्रीनग- रच्या ईशान्येस ५० मैलांवर सिंद दऱ्याच्या पायथ्याशी .आहे. येथील सृष्टिसौंदर्य गुलमर्गपेक्षां रमणीय आहे. येथें झाडी दाट असून सर्व वाटिकेवर अनेक जातींच्या व रंगांच्या पुष्पांचा जसा काय गालिचा पसरल्या- सारखा दिसत असून तिच्या वरच्या बाजूस बर्फाच्छादित शिखरें वज्जमण्यांच्या मुकुटाप्रमाणें झळकत असतात आणि चांदीच्या रसाप्रमाणें निर्मल पाण्याचे ओघ खाली येत असलेले दृष्टीस पडतात. या पुष्पांसंबंधी असा एक चमत्कार सांगतात की, वसंतऋतूंत येथें प्रातःकाळी जी पुष्पें तांबडी, पिंवळी, अस्मानीं व पांढरी दृष्टीस