पान:काश्मीर वर्णन.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १०६ )

मरण येणें हें एक स्वर्गप्राप्तीचें साधनच आहे असें ते मानितात. ही यात्रा जुलई महिन्याचे अखेर भरते. या स्थलीं तीन गुहा आहेत. शिवस्थानाच्या गुहेची लांबी व मुखाजवळ रुंदी अजमार्से १५० फूट असून तिची उंची १०० फूट आहे. गुहेच्या वरच्या भागांतून जें पाणी ठिकत असते त्याच्या योगानें येथील शंकराचा देह बनतो आणि तो चंद्राच्या उदयाप्रमाणें वृद्धि पावतो आणि अस्ताप्रमाणें क्षीण होत जातो असें भाविक लोक मानितात. तसेंच यात्रेकरू लोक देवाचें दर्शन घेऊन त्याची प्रार्थना करूं लागतात, तेव्हां त्यांच्या गोंगाटाने गुहेंतील पावे जर बाहेर पडले तर देवानें आपलें गा-हाणें ऐकिलें असें समजतात. हिमालयावर बद्रेि- नाथ नांवाचें असें एक प्रसिद्ध स्थान आहे, तसें या देशांतही अमरनाथापासून थोड्या अंतरावर याच नांवाचें एक विष्णुस्थान आहे.

गुलमर्ग (पुष्पवाटिका ) - या नांवाची दरी श्रीन-

गरच्या पश्चिमेस सोपूर गांवाहून १७ मैलांवर आहे. हिची लांबी दोन तीन मैल असून रुंदी फार तर एक मैल होईल. या देशांत अति मनोहर वनश्री करितां जी स्थलें प्रसिद्ध आहेत त्यांतील हें एक स्थल मुख्य होय. याच्या भोंवत दाट झाडी आहे. येथें बाराही महिने थोडा- बहुत पाऊस पडत असतो. त्यामुळे हा प्रदेश हिरव्या गार गवतानें आच्छादिला जाऊन निरनिराळ्या जातींचे वृक्ष व वेली यांच्या पुष्पांनी हें स्थल अत्यंत शोभायमान् आणि रमणीय दिसतें. जुलई व आगस्ट श्रीनगर येथे जेव्हां उन्हाळा फार होतो, तेव्हां साहेब महिन्यांत