पान:काश्मीर वर्णन.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १०५ )

देखावा. अत्यंत मनोहर असून उन्हाळ्यांत राहण्यास में स्थल मोठें सुखकर आहे. सर रि० टेंपल साहेब या स्थलास काश्मीरचें सार असे म्हणतात. येथें महाराजांचें एक सुंदर मंदिर आहे. त्यांत प्रतिष्ठित प्रवाशांस कांहीं दिवस राहू देतात. याच्या मागच्या बाजूस एक अष्टपैलू तलाव आहे. तो शंभर फूट लांच व पन्नास फूट खोल येईल. याच्या शेजारी नूरजहाननें सांगितल्या बेताप्रमाणें बादशाहानें एक आरा- मबाग तयार केली होती. तींतील पाण्याचे नळ, खजिने, कारंजी यांच्या खुणा अद्यापि दृष्टीस पडतात. याच्या वरच्या बाजूस पाईन व दुसऱ्या वृक्षांची दाट झाडी लांगून गेली असून येथील देखावा मोठा रमणीय आहे. जहांगीर व त्याची प्रिया यांचें हें मोठें आवडतें स्थल होतें. बादशाहाच्या मनांत आपला अंतकाळ येथें व्हावा असें होतें. त्यांतून डोंगरासारिखे

अमरनाथ -अमरनाथाचें शिवस्थान काश्मी-

रच्या ईशान्येस लिडार नांवाचे दऱ्यांत आहे. सिंधु नदीजवळ पंजतरणी म्हणून एक दरा आहे. या स्थानास मार्ग जातो. हा मार्ग समय विशेष मोठा धोक्याचा आहे, कारण वाटेंत कोठें कोठें मोठे बर्फाचे गोळे व पावसाच्या योगानें बाजूंचे पर्वत विभागून त्यांचे एवढे प्रचंड खडपे मार्गावर येऊन पड- तात कीं, हत्तीसारखें जनावर सुद्धा त्यांच्या खालीं गारद होऊन जाईल. तत्रापि हिंदू लोक जसें काशीस मोठें पवित्र स्थान मानितात, तसे आपल्या देशांतील व काश्मीरांतील हजारों हिंदू लोक या स्थलास मानून मोठ्या भक्तीनें याच्या यात्रेस जातात. या मार्गात पवित्र