पान:काश्मीर वर्णन.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १०४ )

दळून तयार होते. पांपूराप्रमाणे येथेंही केशराच्या बागा असून त्यांत बरेंच केशर उत्पन्न होतें. या गांवाच्या • पूर्वेस गणेशवाल नांवाचें एक गणपतीचें देवालय आहे. त्याजविषयीं अशी कथा आहे कीं, शंकर कैलासास जात असतां ते गणपतीस येथें ठेवून पुढे गेले. अम- रनाथ नांवाचें शिवस्थान येथून ६० मैल आहे. तेथें जाणारे यात्रेकरू आपली शिधासामुग्री या गांवी भरून घेतात.

अचिबल – या नांवाचें स्थल इस्लामवादेच्या

पूर्वेस ६ मैलांवर आहे. हें स्थल मुख्यत्वेंकरून येथील सुंदर झरे व वनश्री करितां विशेष प्रसिद्ध आहे. ही वनश्री इतकी मनोरम आहे कीं, काश्मीर देशास भूस्वर्ग असें जें नांव पडलें आहे, त्याचें मुख्य कारण हें स्थल असावें असें नाईट साहेब यांचें मत आहे. ही जागा नूरजहानची मोठी आवडती होती. येथे एक मोठा बगीचा असून त्यांत एकावर एक चढतीं दालनें केली आहेत. शालिमार बागेप्रमाणे या दालनांत कारंजी केली असून पाणी नळानें चौहोंकडे खेळविलें आहे व त्याचे लहान पण दुमदार धबधबे बनविले आहेत. येथून जवळ बिंघ नांवाची एक नदी कांहीं अवकाशपर्यंत गुप्तरूपानें वाहत असून तिजपासून या झन्यांची उत्पत्ति झाली असें मानितात. यांचें पाणी कारंजाप्रमाणे वर उडतें आणि बर्फासारिखें थंड असतें.

वर्नाग - हें गांव अचिवलपासून १५ मैलांवर

शाहाबाद नांवाच्या दरींत पर्वताच्या पायथ्याशी आहे. वर्नाग नांवाचा झरा याच्या शेजारी आहे. येथील