पान:काश्मीर वर्णन.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १०३ )

मे० कनिंगहाम साहेबांनी दिलेले फोटो (तसबिरी) पहावे व वर्णन वाचावें. इ० स० १६०० त यांतील कांहीं कामें बऱ्या स्थितीत होतीं असें प्रसिद्ध इतिहासकार फेरिस्ता ह्मणतो.

इस्लामाबाद (तारणपूर ) - हे गांव श्रीनगरा-

पासून वितस्तेच्या कांठी तेतीस मैलांवर आहे. येथे पात्राची रुंदी ८० यार्ड आहे. याचें जुनें नांव अनंतनाग, हें पूर्वकाली एक मोठे शहर होतें. हें गांव एका सुळकेदार टेंकडीच्या पायथ्याशी वसले आहे. ही टेंकडी काश्मीर दयाच्या प्रत्येक भागांतून दृष्टीस पडते. हें गांव फल- बागा, चिनार, पाप्लर, पिअर, आक्रोड इत्यादि वृक्षराजींनीं आच्छादिलें असून त्या वृक्षांवर द्राक्षवेली व दुसऱ्या लता पसरल्या आहेत. येथें सरकारी एक बाग असून त्यांत महाराज कधीं कर्धी राहतात. हें गांव मुख्यत्वें- करून येथील अनेक झऱ्यांकरितां प्रसिद्ध आहे. यांत अनंतनाग, सलिकनाग, मलिकनाग आणि सोनार- पोकरी हे मुख्य होत. अनंतनाग हा झरा विष्णूच्या पादताडनानें उत्पन्न झाला असे समजून लोक त्यास मोठा पवित्र मानितात. हा झरा सरकारी बागेच्या अगदी नजीक आहे. याचें पाणी फार उत्तम मानिलें असून त्याचे इस्लामबादच्या पुष्कळ भागांत नळ बांधून नेले आहेत. यांतील एक दोन झन्यांतून ज्वालाग्राही वायु निघतो. सांप्रत या गांवी सुमारे एक हजार घरें असून लोकसंख्या पांच हजार होईल. येथें शाली, लोंक-1 रीच्या दुलया (रग्ज), चिटें व दुसरे कपडे तयार करि- तात. येथें एक पानचकी आहे, तिच्या योगानें कणीक