पान:काश्मीर वर्णन.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १०२ )

काम काळ्या संगमरवरी दगडांचें केलें होतें. त्यावरील कोरीव काम अगदीं झिजून गेलें असल्यामुळे ते चांगलें ओळखतां येत नाहीं. या देवालयाची लांबी सुमारें २४०, रुंदी १४० व उंची ४० फूट आहे. त्यास ( पांडकी- लेर) पांडवांचें घर असें ह्मणतात. हे पाण्यांत बांधलेलें असून त्यास जाण्यास दगडी पायरस्ता होता. त्याच्या खुणा अद्यापि दृष्टीस पडतात. ललितादित्य राजानें हैं देवालय बांधिलें असा राजतरंगिणींत लेख आहे. हुजेल नांवाचे प्रसिद्ध जर्मन ग्रंथकार हें देवालय पांडवांनी बांधिलें असें ह्मणतात, पण या ह्मणण्यास आधार कोणता हे समजत नाही. शिकंदर उर्फ भुशिकन ( मूर्ति फोडणारा ) यानें येथील देवालयांचा व दुसऱ्या इमार- तींचा नाश केला. यांची बांधणावळ ग्रीक आणि रोमन बांधणावळीसारखी होती असें एक इंग्लिश ग्रंथकार लिहितो. या स्थलाच्या आसमंतात् वाहणारे स्वच्छ पाण्याचे प्रवाह, वृक्षराजींनी आच्छादिलेले झरे, फल- पुष्पांनी शोभायमान् झालेल्या बागा, हिरवी गार शेतें, या सर्वांच्या सभोंवतीं बर्फानें आच्छादिलेले पर्वत व त्यांची गगनचुंबित शिखरें इत्यादि गोष्टींनी या जाग्यास अत्यंत शोभा आली आहे. येथील प्रमाणें अप्रतिम व रमणीय वनश्री पृथ्वीवर कोठें नाहीं असें कप्तान बेट्स ह्मणतात. पाद्रितनू, अवंतीपूर व मार्तंड येथील प्राचीन इमार- तींचे अवशिष्ट भाग पाहिले असतां ती कामें किती भव्य असावीं व काश्मीरी लोक शिल्पकलेत किती प्रविण • असावे, याची एकदम कल्पना करितां येते. ती कामें पाहण्याची ज्यास अनुकुलता नाहीं, त्यांनी त्यांचे